हायकोर्टाने ‘Tik-Tok’वरील बंदी उठवली

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी ‘टिक-टॉक’ या अॅप्लिकेशनवरील बंदी उठवण्याचा निर्णय सुनावला. त्यामुळे आता ‘टिक-टॉक’ चाहते पुन्हा एकदा हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन डाउनलोड करु शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला ‘टिक-टॉक’ बंदीवरील अंतरिम याचिकेवर 24 एप्रिलपर्यंत निर्णय देण्यास सांगितले होते. तसेच, यावर निर्णय देण्यात अपयशी ठरल्यास …

tik tok video app, हायकोर्टाने ‘Tik-Tok’वरील बंदी उठवली

नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी ‘टिक-टॉक’ या अॅप्लिकेशनवरील बंदी उठवण्याचा निर्णय सुनावला. त्यामुळे आता ‘टिक-टॉक’ चाहते पुन्हा एकदा हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन डाउनलोड करु शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी मद्रास उच्च न्यायालयाला ‘टिक-टॉक’ बंदीवरील अंतरिम याचिकेवर 24 एप्रिलपर्यंत निर्णय देण्यास सांगितले होते. तसेच, यावर निर्णय देण्यात अपयशी ठरल्यास या अॅपवरील बंदी हटवण्यात यावी, असंही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं.

‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशनच्या माध्यमातून चुकीचा आणि अश्लील कंटेट पसरवला जात आहे, असं सांगत मद्रास उच्च न्यायालयाने या महिन्यात ‘टिक-टॉक’वर बंदी घातली होती. त्यानंतर हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन हटवण्यात आलं होतं. मद्रास उच्च न्यायालयाने 17 एप्रिलला चीनी कंपनी बाईटडान्सच्या ‘टिक-टॉक’वरील बंदी हटवण्यासंबंधीत याचिकेला फेटाळून लावलं. बाईटडान्स याच कंपनीने ‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशन तयार केलं होतं.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन केलं आणि ‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशनवरील बंदी उठवण्यास नकार दिला. त्यानंतर गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवरुन हे अॅप्लिकेशन हटवण्यात आलं होतं.

या प्रकरणाची सुनावणी 22 एप्रिलला झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला या प्रकरणी 24 एप्रिलपर्यंत अंतरिम याचिकेवर निर्णय देण्याचे आदेश दिले. तसेच, जर याप्रकरणी न्यायालय निर्णय देऊ शकलं नाही, तर ‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशनवरील बंदी उठवण्यात यावी, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान ‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशनवर लावण्यात आलेली बंदी उठवण्याचे आदेश दिले.

भारतातील बंदीमुळे ‘टिक-टॉक’ला दिवसाला 3.5 कोटीचं नुकसान

‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशनवर भारतात बंदी घालण्यात आल्यानंतर कंपनीला दर दिवसाला 5 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 3.5 कोटीचं नुकसान होत होतं. चीनची बाईटडान्स टेक्नॉलॉजी ही ‘टिक-टॉक’ अॅप्लिकेशनची डेव्हलपर कंपनी आहे. भारतातील बंदीमुळे होत असलेल्या नुकसान भरपाई करण्यासाठी बाईटडान्स 250 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याच्या विचारात आहे, अशी माहिती कंपनीने चीनच्या एका न्यायालयाला दिली होती.

भारतात ‘टिक-टॉक’चे तीन कोटी युझर्स

‘टिक टॉक’ हे चीनमध्ये तयार करण्यात आलेले अॅप आहे. चीनमध्ये हे अॅप ‘डॉयइन’ नावाने प्रसिद्ध आहे. सप्टेंबर 2016 साली चीनने ‘डॉयइन’ या अॅपला चीनच्या ऑनलाईन मार्केटमध्ये लाँच केलं होत. त्यानंतर वर्षभरात ‘टिक टॉक’ या नावाने हे अॅप जगभरात लाँच झालं. 73 एमबीचे हे अॅप असून जगभरात याचे 1 अरब युजर्स आहेत. तर एकट्या भारतात याचे तीन कोटीहून जास्त युजर्स आहेत.

संबंधीत बातम्या 

बंदुकीसोबत ‘Tik-Tok’ व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न, गोळी सुटल्याने मृत्यू

गुगल आणि अॅपल प्ले स्टोरवरुन टिक-टॉकचे डाऊनलोडिंग लवकरच बंद होणार

टिक टॉक अॅपवर बंदी की नाही? सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *