फेसबुकचं 'हे' नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देणार

मुंबई : फेसबुक दर दुसऱ्या दिवशी कुठलं ना कुठलं नवं फीचर आणत असतो. फेसबुक आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्न करतो. आता कंपनीने ‘फेसबुक डेटिंग’ या अॅप्लिकेशन मध्ये एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फेसबुकवरील मित्रांना डेट करु शकता. ‘सीक्रेट क्रश’ नावाचं हे नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम शोधण्यात आणि …

फेसबुकचं 'हे' नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम मिळवून देणार

मुंबई : फेसबुक दर दुसऱ्या दिवशी कुठलं ना कुठलं नवं फीचर आणत असतो. फेसबुक आपल्या युझर्सना नेहमी काहीतरी नवीन देण्याच्या प्रयत्न करतो. आता कंपनीने ‘फेसबुक डेटिंग’ या अॅप्लिकेशन मध्ये एक नवं फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फेसबुकवरील मित्रांना डेट करु शकता. ‘सीक्रेट क्रश’ नावाचं हे नवं फीचर तुम्हाला तुमचं प्रेम शोधण्यात आणि मिळवून देण्यात मदत करेल. यामध्ये तुम्ही कुठल्याही नऊ अशा मित्रांना जोडू शकता ज्यांना तुम्ही डेट करु इच्छिता.

फेसबुकने कॅलिफोर्नियाच्या सान जोस येथे मंगळवारी झालेल्या वार्षिक ‘एफ 8’ सम्मेलनात या फीचरबाबत माहिती दिली. “जर तुम्ही तुमच्या क्रशला ‘फेसबुक डेटिंग’साठी निवडलं असेल, तर त्यांना एक नोटीफिकेशन जाईल की, त्यांना कुणी पसंत केलं आहे. त्यानंतर जर त्याने त्याच्या ‘सीक्रेट क्रश’मध्ये तुम्हाला निवडलं, तर हे ‘मॅच’ म्हणजेच एक जोडी बनेल”, असं या संमेलनात सांगण्यात आलं.

“जर तुमचा क्रश ‘डेटिंग’वर नसेल, तर ‘सीक्रेट क्रश’ यादी बनवू नका. तसेच, त्यांच्या यादीतही जोडले जाऊ नका, जेणेकरुन कुणालाही तुम्ही कुठल्या मित्राचं नाव जोडलं आहे, हे कळणार नाही”, असेही फेसबुकने सांगितले.

फेसबुकवर तुम्ही फेसबुक इवेंट्स, ग्रुप्स, फ्रेंड्स ऑफ फ्रेंड आणि इतर कुठल्याही कम्यूनिटी इत्यादी पर्यायांद्वारे तुम्ही स्वत:साठी ‘मॅच’ शोधू शकता.

हे फीचर कोलंबिया, थायलंड, कॅनडा, अर्जेन्टीना आणि मेक्सिको येथील फेसबुक युझर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं होतं. मात्र, आता हे फीचर फिलिपिन्स, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, लाओस, ब्राझील, पेरु, चिली, बोलिव्हिआ, इक्वाडोर, उरुग्वे, पराग्वे, गयाना आणि सुरीनाम इत्यादी देशांमध्ये पोहोचलं आहे.

तसेच, युझर्सची शाळा, कार्यालय किंवा शहरातील सारख्या कम्युनिटीमधील नवीन लोकांशी ओळख व्हावी, मैत्री व्हावी यासाठी कंपनीने ‘मीट न्यू फ्रेंड्स’ हे फीचर आणलं आहे, असेही फेसबुकने सांगितलं.

संबंधित बातम्या :

कॉलेज तरुणांसाठी खास विजेवर चालणारी स्कूटी

परवानगीशिवाय ‘गुगल पे’ भारतात कसं चालतंय? हायकोर्टाचा सवाल

निवडणुकीसाठी ट्विटरने नियम बदलले

दक्षिण कोरिया : जगातील पहिला 5G सेवा सुरु करणार देश

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *