तीन रिअर कॅमेरे, 6GB रॅम, सॅमसंगच्या या फोनवर भरघोस सूट

मुंबई : सॅमसंगने नुकताच तीन कॅमेराचा गॅलेक्सी ए7 (Galaxy A7) स्मार्टफोन लाँच केला होता. मात्र आता गॅलेक्सी ए7 स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. या फोनच्या किंमतीत घट केल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. आता हा फोन दोन हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. गॅलेक्सी ए7 फोन बाजारात 4 जीबी आणि 6 जीबी अशा …

, तीन रिअर कॅमेरे, 6GB रॅम, सॅमसंगच्या या फोनवर भरघोस सूट

मुंबई : सॅमसंगने नुकताच तीन कॅमेराचा गॅलेक्सी ए7 (Galaxy A7) स्मार्टफोन लाँच केला होता. मात्र आता गॅलेक्सी ए7 स्मार्टफोनवर भरघोस सूट दिली जात आहे. या फोनच्या किंमतीत घट केल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. आता हा फोन दोन हजार रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. गॅलेक्सी ए7 फोन बाजारात 4 जीबी आणि 6 जीबी अशा दोन व्हेरिएेंटमध्ये उपलब्ध आहे.

प्रत्येक कंपनीकडून वेगवेगळ्या ऑफर्स देऊन नेहमीच ग्राहकांना आकर्षित केले जाते. सॅमसंगनेही आपल्या फोनच्या किंमतीत घट करत ग्राहकांना आकर्षित करण्याची नवीन शक्कल लढवली आहे. गॅलेक्सी ए7 नुकताच हा फोन लाँच केला होता. तीन कॅमेरा असलेला सॅमसंगचा हा पहिला फोन आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज फोन 23,990 रुपये तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजचा फोन 28,990 रुपये किंमतीमध्ये लाँच केला होता. 91 मोबाईलच्या रिपोर्टनुसार सॅमसंगने ऑफलाईन मार्केटमध्ये मर्यादित वेळेसाठी फोनवर दोन हजार रुपयांची सूट देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता 4 जीबी रॅमचा फोन 21,990 रुपये आणि 6 जीबी रॅमचा फोन 26,990 मिळणार आहे. ही ऑफर 23 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए7 स्पेसिफिकेशन

  • 6 इंच आकाराचा एचडी एमोलेड डिस्प्ले
  • 2.2GHz ऑक्टा- कोअर प्रोसेसर
  • 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम व्हेरिएेंट
  • 64 जीबी आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज
  • सेल्फी कॅमेरा 24 मेगापिक्सल
  • रिअर कॅमेरा 24+8 मेगापिक्सल
  • बॅटरी क्षमता 3300mAh

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *