आधार कार्डमुळे घरबसल्या जिंका 30 हजार रुपये

आधार कार्डद्वारे तुम्ही घरबसल्या 30 हजार रुपये कमवू शकता. धक्का बसला ना, पण हो हे खर आहे.

आधार कार्डमुळे घरबसल्या जिंका 30 हजार रुपये

मुंबई : आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. पण आता तुम्हाला याच आधार कार्डद्वारे तुम्ही घरबसल्या 30 हजार रुपये कमवू शकता. धक्का बसला ना, पण हो हे खर आहे. आधार क्रमांक जारी करणाऱ्या यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) संस्थेने  ‘My Aadhaar Online Contest’ चे आयोजन केले आहे.

युआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला एक व्हिडीओ बनवावा लागणार आहे. हा व्हिडीओ 30 ते 120 सेंकदाचा  असणे गरजेचे आहे. आधारद्वारे देण्यात येणाऱ्या एखाद्या सेवेबाबत तुम्हाला हा अनिमेटेड व्हिडीओ तयार करावा लागणार आहे. आधारच्या ज्या सेवेबाबत तुम्ही हा व्हिडीओ बनवणार आहात, तो व्हिडीओ इतरांना अगदी  सहजतेने समजला पाहिजे. या व्हिडीओ तुम्ही हिंदी किंवा इंग्रजी या भाषेतून बनवू शकता. ही स्पर्धा 18 जूनपासून सुरु झाली असून यात तुम्ही येत्या 8 जुलैपर्यंत सहभाग घेऊ शकता.

यासाठी युआयडीएआयने आधारच्या 15 सेवांची विभागणी केली आहे. यात तुम्ही कितीही सेवांचे अनिमेटेड व्हिडीओ बनवून पाठवू शकता. या अनिमेटेड व्हिडीओ बनवण्याच्या स्पर्धेत कोणतीही टीम सहभागी होऊ शकत नाही. तुम्हाला एकट्यालाच हा व्हिडीओ तयार करुन पाठवायचा आहे. तसेच तुम्ही या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिलेला व्हिडीओ हा तुम्ही स्वत: तयार केलेला हवा असेही युआयडीएआयने सांगितले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुम्ही बनवलेला व्हिडीओ तुम्ही युट्यूब, गुगल ड्राईव्ह याशिवाय इतर व्हिडीओ शेअरींग प्लॅटफॉर्मवर अपलोड करु शकता. त्यानंतर त्याची लिंक तुम्हाला media.division@uidai.net.in या मेलवर पाठवावी लागेल. हा व्हिडीओ mp4, avi, flv, wmv, mpeg, mov यातील एखाद्या फॉर्मेटमध्ये असणे गरजेचं आहे. तसेच हाय रिझॉल्यूशन आणि फुल एचडी व्हिडीओला या स्पर्धेत प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे तुम्ही जो व्हिडीओ तयार करत आहात, तो कमीत कमी 1080 पिक्सल रिझॉल्यूशन असावा, याची खबरदारी नक्की बाळगा.

या स्पर्धेतील विजेत्यांची नावे युआयडीएआयच्या अधिकृत सोशल मीडियावर अकाऊंटवर 31 ऑगस्टपर्यंत पोस्ट करण्यात येतील. त्यानंतर  पहिल्या तीन विजेत्यांना बक्षीस मिळेल. युआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या विजेत्याला 20 हजार रुपये, दुसऱ्या विजेत्याला 10 हजार रुपये आणि तिसऱ्या विजेत्याला 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

आधार कार्डवरील तुमचा फोटो कसा बदलाल?

तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? इथे चेक करा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *