18,000mAh बॅटरी क्षमता असलेला नवा फोन, पाहा फीचर...

मुंबई : आतापर्यंत अनेक नवीन फोन तुम्ही पाहिले असतील. ज्यामध्ये वेग-वेगळे फीचर दिलेले असतात. मात्र आता 18,000 mAh बॅटरी क्षमता असलेला फोन मार्केटमध्ये आला आहे. या फोनचे वैशिष्ट असे की, हा फोन तुम्ही एकदा चार्ज केला, तर आठवडाभर चार्ज करायची गरज नाही, असा दावा कंपनीने केला आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा फोन प्रदर्शनासाठी लावण्यात आला …

18,000mAh बॅटरी क्षमता असलेला नवा फोन, पाहा फीचर...

मुंबई : आतापर्यंत अनेक नवीन फोन तुम्ही पाहिले असतील. ज्यामध्ये वेग-वेगळे फीचर दिलेले असतात. मात्र आता 18,000 mAh बॅटरी क्षमता असलेला फोन मार्केटमध्ये आला आहे. या फोनचे वैशिष्ट असे की, हा फोन तुम्ही एकदा चार्ज केला, तर आठवडाभर चार्ज करायची गरज नाही, असा दावा कंपनीने केला आहे.

मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये हा फोन प्रदर्शनासाठी लावण्यात आला होता. Energizer Power Max P18K Pop अस या फोनचं नाव आहे. फोन खूप मोठा आहे आणि फोनची थिकनेस 18mm आहे. फोनची स्क्रीन 6.2 इंच आहे आणि यामध्ये पॉप अप कॅमेरा आहे. सेल्फीसाठी पॉप अप मॉड्यूलमध्ये एक नाही, तर दोन कॅमेरे दिले आहेत.

या फोनमध्ये सलग 48 तास व्हिडीओ तुम्ही पाहू शकता, असा दावाही कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटर्नल मेमरी दिली आहे. यामध्ये मीडिया टेक प्रोसेसर आहे आणि Android 9 Pie वर हा फोन चालतो. कंपनीनुसार या फोनला पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात. यामध्ये फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

कंपनी सध्या हा स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्याची तयारी करत आहे. पुढील दोन-तीन महिन्यात हा फोन लाँच केला जाईल. भारतात कधी लाँच केला जाईल असे विचारले असता, भारतात लाँच करण्याचा विचार नाही, पण लवकरच भारतातही हा फोन लाँच केला जाईल, असे कंपनीने सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *