विवोचा नवा फोन, दोन डिस्प्ले, तीन कॅमेरे, पाहा फीचर

मुंबई: विवो आपला नवीन स्मार्टफोन विवो नेक्स 2 लवकरच भारतात लाँच करत आहे. नुकतंच या फोनचा फोटो आणि माहिती इंटरनेटवर लिक झाली. विवोने यापूर्वी लाँच केलेल्या नेक्स या स्मार्टफोनमध्ये बेझेले डिस्प्ले डिझाईन दिलं होतं. तसेच पॉप-अप मोटराईज्ड सेल्फी कॅमेरा सेटअप दिला होता.  यापेक्षाही नवीन फीचर नेक्स 2 या फोनमध्ये देण्यात येणार आहेत. लीक झालेल्या माहितीनुसार नेक्स …

विवोचा नवा फोन, दोन डिस्प्ले, तीन कॅमेरे, पाहा फीचर

मुंबई: विवो आपला नवीन स्मार्टफोन विवो नेक्स 2 लवकरच भारतात लाँच करत आहे. नुकतंच या फोनचा फोटो आणि माहिती इंटरनेटवर लिक झाली. विवोने यापूर्वी लाँच केलेल्या नेक्स या स्मार्टफोनमध्ये बेझेले डिस्प्ले डिझाईन दिलं होतं. तसेच पॉप-अप मोटराईज्ड सेल्फी कॅमेरा सेटअप दिला होता.  यापेक्षाही नवीन फीचर नेक्स 2 या फोनमध्ये देण्यात येणार आहेत.

लीक झालेल्या माहितीनुसार नेक्स 2 स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात येणार आहेत. दोन स्क्रीन असलेला कंपनीचा हा पहिला फोन असेल. विवोच्या नेक्स 2 चा मॉडेल नंबर VivoV1821A आहे. यामध्ये 10 जीबी रॅम असल्याचे सांगितलं जात आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असेल. तसेच फोनमध्ये अँड्रॉईड पाय सिस्टीम आहे.

विवोच्या नवीन फोनमध्ये विशेष करुन फ्रंट आणि रिअर स्क्रीन असेल. मोबाईलवर फ्रंट कॅमेरा नाही, मात्र रिअरवर तीन कॅमेरे दिले आहेत. डिव्हाईसमध्ये रिअर कॅमेरावर एक रिंग शेपमध्ये लाईट्स सुद्धा आहे. 6.5 इंचाचा  बेझेल लेस डिस्प्ले पुढे आहे आणि 5.5 इंच डिस्प्ले रिअरवर असेल. फोनमध्ये  दोन डिस्प्ले असल्यामुळे बॅटरी साईज छोटी देण्यात आली आहे.

विवो नेक्स 2 स्मार्टफोन 11 डिसेंबरला भारतात लाँच केला जाणार आहे. कंपनीने चीनमध्ये रजीस्ट्रेशनला सुरुवातही केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *