आयफोन ग्राहकांसाठी खूशखबर

मुंबई : अॅपलने आयफोनच्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार आयफोन युजर्सच्या फोनची बॅटरी खराब झाली असेल किंवा खराब होणार असेल, तर ती बॅटरी 31 डिसेंबरपर्यंत अॅपलच्या रिप्लेसमेंट स्कीमच्या माध्यमातून बदलू शकतात. या स्कीममध्ये अॅपल ग्राहकांना 1,800 ते 2000 रुपयामध्ये आयफोनची बॅटरी उपलब्ध करुन देत आहे. अॅपलच्या या ऑफरमुळे अंदाज लावला जात आहे …

, आयफोन ग्राहकांसाठी खूशखबर

मुंबई : अॅपलने आयफोनच्या ग्राहकांसाठी शानदार ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरनुसार आयफोन युजर्सच्या फोनची बॅटरी खराब झाली असेल किंवा खराब होणार असेल, तर ती बॅटरी 31 डिसेंबरपर्यंत अॅपलच्या रिप्लेसमेंट स्कीमच्या माध्यमातून बदलू शकतात.

या स्कीममध्ये अॅपल ग्राहकांना 1,800 ते 2000 रुपयामध्ये आयफोनची बॅटरी उपलब्ध करुन देत आहे. अॅपलच्या या ऑफरमुळे अंदाज लावला जात आहे की, त्यांच्या आयफोन बॅटरीच्या किंमतीत घट करणार आहे.

या ऑफरमध्ये आयफोन एसई, आयफोन 6 एस, आयफोन 6 एस प्लस, आयफोन 7, आयफोन 7 प्लस, आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसच्या व्यतिरिक्त आयफोन X चा ही समावेश आहे. अॅपलने या ऑफरमध्ये आयफोन एक्सएस आणि आयफोन एक्सआरचा समावेश केला नाही.

अॅपलच्या या ऑफरचा फायदा भारतातील युजर्सही घेऊ शकतात. तसेच अॅपलने आयओएस 11 च्या अपडेट सोबत बॅटरी हेल्थ ऑप्शनही लाँच केला आहे. बॅटरी हेल्थ ऑप्शनच्या माध्यमातून युजर्स आपल्या फोनच्या बॅटरीची परिस्थिती जाणून घेऊ शकतो.

आपल्या फोनच्या बॅटरीची स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये सेटिंग् या ऑप्शनवर जाऊन पाहावे लागेल. जर तुम्हाला वाटते तुमची बॅटरी आधीपेक्षा व्यवस्थित चालत नाही तर तुम्ही ती रिप्लेस करु शकता. यासाठी तुम्हाला जवळच्या अॅपल शॉपमध्ये जावं लागेल. तिथे तुम्ही तुमच्या मोबाईलची बॅटरी सवलतीमध्ये खरेदी करु शकता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *