व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरने अनेकांची डोकेदुखी वाढणार

मुंबई : इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे तर आजकाल सर्वच वापरतात. याचे अनेक फीचर्स आपल्यासाठी फायद्याचे ठरले. म्हणून अगदी काही दिवसांतच हे अॅप लोकप्रिय झालं. पण आता कदाचित व्हॉट्सअॅप आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं आणि याचं कारण म्हणजे व्हॉट्सअॅपचं नवं फीचर. आता व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येत आहे. यामध्ये नोटिफिकेशन पॅनलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओचा प्रिव्ह्यू बघायला मिळणार […]

व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरने अनेकांची डोकेदुखी वाढणार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे तर आजकाल सर्वच वापरतात. याचे अनेक फीचर्स आपल्यासाठी फायद्याचे ठरले. म्हणून अगदी काही दिवसांतच हे अॅप लोकप्रिय झालं. पण आता कदाचित व्हॉट्सअॅप आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतं आणि याचं कारण म्हणजे व्हॉट्सअॅपचं नवं फीचर.

आता व्हॉट्सअॅपचं एक नवीन फीचर येत आहे. यामध्ये नोटिफिकेशन पॅनलमध्ये व्हॉट्सअॅपवर आलेल्या व्हिडीओचा प्रिव्ह्यू बघायला मिळणार आहे. जेव्हा आपल्याला कुठला व्हिडीओ येतो, तेव्हा नोटिफिकेशनमध्ये त्याचा स्नॅपशॉट दिसतो.

WAbetainfo च्या एका रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर iOS यूझर्ससाठी आहे. ज्यांच्याकडे 2.18.102.5 वर्जन इंस्टॉल्ड आहे, तेच हे फीचर वापरू शकतात. हे फीचर बीटा टेस्टिंगमध्ये असल्याने अद्याप सर्वांपर्यंत पोहोचलेलं नाही. लवकरच अपडेट केल्यानंतर हे फीचर सर्व iOS यूझर वापरू शकणार आहेत.

व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर अनेकांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. कारण आपल्याला अनेकदा खसगी किंवा संवेदनशील व्हिडीओ कंटेंट पाठवला जातो, जो आपण कुणाशी शेअर करू इच्छित नाही. पण या फीचरनंतर नोटिफिकेशन पॅनलवर काही वेळासाठी व्हिडीओचा प्रिव्ह्यू दिसेल. जर तुम्ही नोटिफिकेशन ऑन ठेवलं असेल तर लॉक स्क्रीनवरही व्हिडीओचा प्रिव्ह्यू दिसू शकतो.

हवं असल्यास सेटिंग्जमध्ये जाऊन या फीचरला रिस्ट्रिक्ट करू शकता. जेणेकरुन नोटिफिकेशनमध्ये व्हिडीओ प्रिव्ह्यू दिसणार नाही. याशिवाय व्हॉट्सअॅपमधील ऑटो डाऊनलोड डिसेबल करायच ऑप्शनही वापरू शकता.

व्हॉट्सअॅपने नुकतंच ऑफिशियल iOS बीटा प्रोग्रामची सुरवात केली, याआधी पर्यंत हे ऑप्शन अँड्रॉईडसाठी होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.