आता व्हॉट्सअॅपवरही 'Boomerang' करा 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामचे (Instagram) बूमरँग (Boomerang) फिचर फार लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामचे हे लोकप्रिय फिचर लवकरच व्हॉट्सअॅपमध्येही (WhatsApp) वापरता येणार आहे.

आता व्हॉट्सअॅपवरही 'Boomerang' करा 

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामचे (Instagram) बूमरँग (Boomerang) फिचर फार लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामचे हे लोकप्रिय फिचर लवकरच व्हॉट्सअॅपमध्येही (WhatsApp) वापरता येणार आहे. फेसबुकची (Facebook) मालकी असलेले व्हॉट्सअॅप यावर सध्या काम करत आहे. WABetaInfo या वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.

WABetaInfo यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटसअॅपचे नवीन फिचरवर सध्या कंपनी काम करत आहे. व्हॉट्सअॅपवर बूमरँगचा व्हिडीओ हा 7 सेंकदापर्यंत तयार करता येणार आहे. यानंतर तुम्ही तयार केलेले बूमरँग GIF किंवा व्हिडीओ रुपात स्टेटसला पोस्ट करु शकता.

सुरुवातीला बूमरँगचे हे फिचर iOS म्हणजे आयफोनवर येणार आहे. त्यानंतर हे फिचर अँड्राईड युजर्सला (Android) वापरता येईल. दरम्यान हे फिचर कधी लाँच होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. याशिवाय तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप अकाऊंट एका मोबाईल व्यतिरिक्त इतर मोबाईलवरही वापरता येऊ शकता.

फेसबुकची मालकी असलेल्या इंस्टाग्राममध्ये  2015 मध्ये बूमरँगचे फिचर लाँच केले होते. त्यानंतर 2016 पासून इंस्टाग्राम युजर्सने हे फिचर वापरण्यास सुरुवात केली. इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअॅपवरही बूमरँगचे फिचर असावे अशी मागणी युजर्सकडून वारंवार होत होती. त्यानुसार कंपनीने यावर काम करण्यास सुरुवात केली असून येत्या महिन्याभरात हे फिचर लाँच होऊ शकते असं बोललं जातं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *