शाओमीचा बंपर सेल, तारखा जाहीर

मुंबई : जर तुम्ही चांगला स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चिनी कंपनी शाओमी सध्या Redmi Note 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवा फोन लाँच करण्याअगोदर शाओमीने अनेक स्मार्टफोनच्या दरात कपात केली आहे. कंपनीने Redmi 6 सीरीजच्या फोनवर काही वेळासाठी प्राईम कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 फेब्रुवारी ते 8 …

शाओमीचा बंपर सेल, तारखा जाहीर

मुंबई : जर तुम्ही चांगला स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चिनी कंपनी शाओमी सध्या Redmi Note 7 लाँच करण्याच्या तयारीत आहे. हा नवा फोन लाँच करण्याअगोदर शाओमीने अनेक स्मार्टफोनच्या दरात कपात केली आहे. कंपनीने Redmi 6 सीरीजच्या फोनवर काही वेळासाठी प्राईम कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान शाओमीचे लोकप्रिय स्मार्टफोन्स Redmi 6A, Redmi 6 आणि Redmi 6 Pro वर सूट देण्यात येणार आहे.

शाओमीच्या ट्वीटनुसार एमआय डॉट कॉम, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन इंडियावर Redmi 6A, Redmi 6 आणि Redmi 6 Pro स्वस्त दरात उपलब्ध असणार आहेत.

या ऑफरनुसार, Redmi 6A 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजचा फोन 5,999 मध्ये मिळणार आहे. याची किंमत 6,999 रुपये आहे. Redmi 6 च्या किंमतीतही कपात करण्यात आली आहे. याचा 3GB रॅम असलेला व्हेरीअंट 7,999 रुपयांत उपलब्ध असणार आहे. याची किंमत 8,999 रुपये आहे. Redmi 6 Pro चा 3GB रॅम असलेला व्हेरीअंट 9,999 रुपयांत उपलब्ध असणार आहे. याची किंमत 12,999 रुपये आहे. तसेच या ऑफरमध्ये 1000 रुपयांचा एक्सचेंज ऑफरही देण्यात आला आहे.

शाओमी याच महिन्यात आपला नवा स्मार्टफोन Redmi Note 7 लाँच करणार आहे. यासाठी कंपनी 48 मेगापिक्सल हॅशटॅग सोबत याला प्रमोट करत आहे. कारण या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. याआधी हा पोन चीनमध्ये लाँच करण्यात आला, तिथे या फोनची किंमत 999 युआन म्हणजेच जवळपास 10, 625 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर भारतात हा फोन 10,999 रुपयांत लाँच केला जाऊ शकतो. त्याशिवाय Redmi Note 7 Pro हा स्मार्टफोनही लवकरच लाँच करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *