सेलदरम्यान दर मिनिटाला 43 Mi TV ची विक्री, Xiaomi चा नवा रेकॉर्ड

ई-कॉमर्स साईट्सवर फेस्टीव्ह सेल सुरु आहे आणि Xiaomi ने दावा केला आहे की त्यांच्या प्रॉडक्ट्सनी या दरम्यान नवा रेकॉर्ड केला आहे (Xiaomi New Record). शाओमीच्या मते, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Mi.com वर सुरु असलेल्या फेस्टीव्ह सेलदरम्यान Mi TV चे 2,50,000 पेक्षा जास्त यूनिट्स विकले गेले आहे.

सेलदरम्यान दर मिनिटाला 43 Mi TV ची विक्री, Xiaomi चा नवा रेकॉर्ड

मुंबई : ई-कॉमर्स साईट्सवर फेस्टीव्ह सेल सुरु आहे आणि Xiaomi ने दावा केला आहे की त्यांच्या प्रॉडक्ट्सनी या दरम्यान नवा रेकॉर्ड केला आहे (Xiaomi New Record). शाओमीच्या मते, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Mi.com वर सुरु असलेल्या फेस्टीव्ह सेलदरम्यान Mi TV चे 2,50,000 पेक्षा जास्त यूनिट्स विकले गेले आहे. भारतीय ग्राहकांसाठी सेल दरम्यान Mi TV हीट ठरला आणि आंकड्यांनुसार कंपनीने दर मिनिटाला 43 Mi TV ची विक्री झाली (Xiaomi Mi TV sale). हा एक रेकॉर्ड आहे. शाओमीने यासाठी त्यांच्या ग्राहकांचे आभारही मानले.

स्मार्टफोन क्षेत्रात आधीच आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या शाओमीने स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्येही आपलं स्थान पक्क केलं आहे. कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स देणाऱ्या Mi TV वर फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलिअन डेज’ (Flipkart big billion days) सेल आणि अॅमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टीव्हल’ (Amazon great Indian sale) सेलदरम्यान मोठी सूट ग्राहकांना मिळत आहे.

अॅमझॉन इंडियावर 43 इंचाचा Mi TV 4A Pro आणि 32 इंचाचा Mi TV 4C Pro हे दोन टीव्ही सर्वात जास्त विकले गेले, अशी माहिती कंपनीने दिली.

या स्मार्ट टीव्हीवर सूट

32 इंचाच्या Mi TV 4C Pro ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मवर सध्या 11,499 रुपयांमध्ये मिळतो आहे. तर, 43 इंचाचा Mi TV 4A Pro सेलदरम्यान 19,999 रुपयांमध्ये मिळतो आहे. शाओमीने भारतात मोठी स्क्रिन असलेल्या स्मार्ट टीव्हीची रेंजही लाँच केली. शाओमी सध्या सर्वात मोठी स्क्रिन असलेला 65 इंचाचा Mi TV 4X भारतात लाँच केला आहे.

शाओमीने ग्राहकांचे आभार मानले

‘आमचा स्मार्ट टीव्ही व्यवसाय 2018 पासून भारतात वाढला आणि तेव्हापासून आम्हाला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. तीन महिन्याच्या काळातच Mi TV ओव्हरऑल सेल्समध्ये टॉपवर पोहोचला आहे. सुरुवातीच्या आठ महिन्यात आम्ही 10 लाखांपेक्षा जास्त टीव्ही विकण्यात यशस्वी झालो. सप्टेंबर महिन्यात आम्ही 30 लाख सेल्स अनाउन्स केले. आम्ही ग्राहकांचे आभार मानतो. त्यांच्याकडून मिळणार प्रेम आम्हाला उत्साहित करणारी आहे’, असं शाओमी इंडियाचे Mi TV कॅटगिरीचे प्रमुख ईश्वर नीलकांत यांनी सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *