शाओमी रेडमी 6 प्रोच्या किंमतीत पहिल्यांदाच भरघोस कपात

मुंबई : शाओमीने आणखी एका स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. रेडमी 6 प्रो या स्मार्टफोनची किंमत पहिल्यांदाच कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता. नव्या किंमतीसह हा फोन 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. अमेझॉन किंवा शाओमीच्या वेबसाईटवर हा फोन उपलब्ध आहे. रेडमी 6 प्रो भारतात 10 …

शाओमी रेडमी 6 प्रोच्या किंमतीत पहिल्यांदाच भरघोस कपात

मुंबई : शाओमीने आणखी एका स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. रेडमी 6 प्रो या स्मार्टफोनची किंमत पहिल्यांदाच कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता. नव्या किंमतीसह हा फोन 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. अमेझॉन किंवा शाओमीच्या वेबसाईटवर हा फोन उपलब्ध आहे.

रेडमी 6 प्रो भारतात 10 हजार 999 रुपयांसह लाँच करण्यात आला होता. 3GB रॅम व्हेरिएंटची ही किंमत आहे. दुसरं व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजचं आहे. या व्हेरिएंटची किंमत 12999 रुपये होती. एक हजार रुपये कपातीसह हे व्हेरिएंट आता 11999 रुपयांमध्ये मिळेल.

गेल्या एक ते दीड वर्षांपासून शाओमीचे फोन अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. सॅमसंगसारख्या कंपन्यांना शाओमीने अडचणीत आणलंय. भारतीय बाजारावर शाओमीने पकड मजबूत केली आहे. त्यातच किंमतीमध्ये कपात करुन ग्राहकांना पुन्हा एकदा आकर्षित केलं जातंय.

रेडमी 6 प्रोमध्ये 5.84 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसरवर हा फोन काम करतो. शाओमीच्या कॅमेराचा अनुभव आतापर्यंत तरी चांगला आहे. या फोनमध्येही 12 मेगापिक्सल प्रायमरी आणि दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. अशा पद्धतीने ड्युअल कॅमेरा या फोनमध्ये मिळेल. तर 5 सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

या स्मार्टफोनचं बॅटरी बॅकअप चांगलं असल्याचं बोललं जातंय. 4,000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. शाओमीने काही दिवसांपूर्वीच Mi A2 आणि Redmi Note 6 Pro या फोनचीही किंमत कमी केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *