यूट्यूब व्हिडीओ पाहणाऱ्यांनी ही बातमी वाचा

मुंबई:  इंटरनेट जगतात यूट्यूब हा एक मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबचे लाखो युजर्सदेखील आहेत. मात्र, यूट्यूबवर व्हिडीओ पाहात असताना एका समस्येला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे इच्छा नसतानाही व्हिडीओ दरम्यान येणाऱ्या जाहिराती होय. यावर तोडगा म्हणून यूट्यूब युजर्सला एक चांगला पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे व्हिडीओ सुरू होण्याआधी दिसणाऱ्या जाहिराती बंद करता येतील. …

, यूट्यूब व्हिडीओ पाहणाऱ्यांनी ही बातमी वाचा

मुंबई:  इंटरनेट जगतात यूट्यूब हा एक मोठा व्हिडीओ प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबचे लाखो युजर्सदेखील आहेत. मात्र, यूट्यूबवर व्हिडीओ पाहात असताना एका समस्येला सर्वांनाच सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे इच्छा नसतानाही व्हिडीओ दरम्यान येणाऱ्या जाहिराती होय. यावर तोडगा म्हणून यूट्यूब युजर्सला एक चांगला पर्याय उपलब्ध करून देणार आहे. यामुळे व्हिडीओ सुरू होण्याआधी दिसणाऱ्या जाहिराती बंद करता येतील.   

यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, काही यूट्यूब युजर्स यांच्यावर सर्वेक्षण केल्यानंतर, जाहिराती रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच चांगल्या वाईट जाहिरातींसाठी रेटिंग पॉईंट देखील ठेवली जाणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र एक ऑप्शन असेल.

यूट्यूबच्या या नवीन पर्यायामुळे तुम्ही यूट्यूबवर बिनदिक्कत व्हिडीओ पाहू शकता. तसेच सध्या यूट्यूबवर व्हिडीओ पाहताना, त्या व्हिडीओच्या सुरुवातीला आणि व्हिडीओच्यामध्ये जाहिराती दाखवल्या जातात. पण आता या जाहिराती केवळ व्हिडीओ सुरू होण्याआधीच दिसतील. जर तुम्ही एकदा या जाहिराती स्कीप केल्यानंतर व्हिडीओमध्ये पुन्हा कोणतीही जाहिरात दिसणार नाही.

यामुळे यूट्यूबला मोठा तोटा होणार आहे. यूट्यूबला होणारा हा तोटा भरून काढण्यासाठी युजर्सला नाममात्र पैसे द्यावे लागतील.

यूट्यूबने घेतलेल्या या निर्णयावर गुगलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण यूट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या बहुसंख्या जाहिराती गुगलच्या असतात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *