कधी काचेचा ट्रान्स्परन्ट फोन वापरून पाहिला आहे? समोर आला व्हिडीओ, वायरलेस चार्जरचीही सुविधा

ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर वाला अफशर नामक एका युझरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ते एक स्पेशल ट्रान्स्परंट स्मार्टफोन ऑपरेट करताना दिसत आहेत.

कधी काचेचा ट्रान्स्परन्ट फोन वापरून पाहिला आहे? समोर आला व्हिडीओ, वायरलेस चार्जरचीही सुविधा
कधी काचेचा ट्रान्स्परन्ट फोन वापरून पाहिला आहे? समोर आला व्हिडीओ, वायरलेस चार्जरचीही सुविधाImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 11:32 AM

आयफोन असो वा प्रीमिअम ॲंड्रॉईड स्मार्टफोन(Smartphone), बाजारात सतत नवनवे डिझाईन येतच असतात. टेक्नोसॅव्ही तरूणाईला वेगवेगळी डिझाईन्स, फीचर्स उपलब्ध असलेले स्मार्टफोन वापरण्याची आवड असते. चांगला कॅमेरा, प्रोसेसर, इंटर्नल स्टोरेज यामध्ये विविध बदल घेऊन स्मार्टफोन कंपन्याही दर महिन्याला नवनवी मॉडेल्स (New phone Models) बाजारात लाँच करत असतात. मात्र तुम्ही आत्तापर्यंत कधी काचेसारखा ट्रान्स्परंट स्मार्टफोन (transparent smart phone)पाहिला आहेत का ? विशेष म्हणजचे त्यामध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्टही आहे. नुकताच अशा एका फोनचा व्हिडीओ समोर आला आहे. ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर वाला अफशर नामक एका युझरने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये हा काचेसारखा, ट्रान्स्परंट स्मार्टफोन दिसत आहे. अवघ्या 12 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये हा फोन कसा ऑपरेट होते, त्याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले आहे.

वाला अफशर या युझरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर A transparent smart phone design अशी कॅप्शन देत व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक स्पेशल स्मार्टफोन दिसत आहे. त्यामध्ये एका व्यक्तीच्या हातात दिसणारा हा फोन काचेसरखा असून तो पूर्णत: ट्रान्स्परंट आहे. त्याच्या आरपार बघता येऊ शकते. हा स्मार्टफोन ऑपरेट केल्यानंतर त्याचा इंटरफेस ॲंड्रॉईड ओएसवर काम करताना दिसत आहे. आणि तो स्मार्टफोन बऱ्याच प्रमाणात रेडमीच्या इंटरफेससारखा दिसत आहे. मात्र त्यासंदर्भात कंपनीकडून अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.

वायरलेस चार्जिंगही उपलब्ध :

काचेसारख्या दिसणाऱ्या या फोनमध्ये प्रीमिअम स्मार्टफोनचे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची सिस्टीम दिसत आहे. विशेष म्हणजे त्यातील वायरलेस चार्जिंग पॅडही ट्रान्स्परंट आहे, मात्र त्याला एक काळ्या रंगाची वायर जोडलेली व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडिओमध्ये हा ट्रान्स्परंट फोन फक्त दाखवण्यात आलेला नाही तर तो ऑपरेटही करण्यात आला आहे. 12 सेंकदांच्या या व्हिडीओत आपल्याला फोन ऑपरेट झालेला दिसत असून त्यामध्ये काही ॲप्स दिसतात तसेच सेटिंग्जही दिसतात.

Redmi प्रमाणे इंटरफेस :

लक्षात घेण्यासारखी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे, मोबाईलमध्ये दाखवण्यात आलेला इंटरफेस रेडमी इंटरफेससारखाच असून तो ॲंड्रॉईड ओएसवर चालतो. या व्हिडीओच्या ट्विटर व्हेरिफाइड अकाऊंटने ही पोस्ट केली आहे.

tweet link : https://twitter.com/ValaAfshar/status/1555667862907396096

English Slug A transparent smart phone design, video shared on twitter by user

Keywords transparent smart phone, design, wireless charger, twitter, video, technology ट्रान्स्परंट स्मार्टफोन, वायरलेस चार्जर, ट्विटर, व्हिडिओ, टेक्नॉलॉजी

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.