जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लॅन; 5 जी मध्ये सर्वात वेगवान इंटरनेटचा दावा

त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने चिप निर्माता क्वालकॉमबरोबर भागीदारीची घोषणा केलीय. देशात 5 जी सेवा लवकरात लवकर आणणार असल्याची एअरटेलने मंगळवारी घोषणा केली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:52 PM, 23 Feb 2021
जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा जबरदस्त प्लॅन; 5 जी मध्ये सर्वात वेगवान इंटरनेटचा दावा

नवी दिल्लीः दूरसंचार क्षेत्रात अल्पावधीतच दबदबा निर्माण करणाऱ्या जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं जबरदस्त प्लॅन बाजारात आणलाय. सुनील भारती मित्तल यांची एअरटेल कंपनी दूरसंचार क्षेत्रात जिओला आव्हान देण्याच्या योजनेवर वेगवान काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने चिप निर्माता क्वालकॉमबरोबर भागीदारीची घोषणा केलीय. देशात 5 जी सेवा लवकरात लवकर आणणार असल्याची एअरटेलने मंगळवारी घोषणा केली. (Airtel Join Hands With Qualcomm For 5g Services)

नुकतीच हैदराबादमध्ये एअरटेलने थेट व्यावसायिक नेटवर्कवर 5 जी सेवेचं प्रात्यक्षिक दाखवलं होतं. त्यानंतर एअरटेल ही अशी काम करणारी भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी बनली आहे. हैदराबाद कार्यक्रमानंतर कंपनीने असा दावा केला की, ही देशातील पहिली दूरसंचार कंपनी बनली आहे जी प्रथमच देशात 5G सेवा आणत आहे.

एअरटेलची तयारी काय?

एअरटेलच्या निवेदनानुसार, कंपनी आपल्या नेटवर्क विक्रेते आणि डिव्हाइस भागीदारांद्वारे क्वालकॉमच्या 5 जी आरएएन प्लॅटफॉर्मचा उपयोग ग्राहकांना करून देणार आहे. एअरटेल ओ-रॅन आघाडीच्या संचालक मंडळाचे सदस्य असल्याने ते यशस्वी करण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनी क्वालकॉमबरोबर भारतात ओ-रॅन लागू करण्यासाठी काम करत आहे. ”

घरी फास्ट इंटरनेट उपलब्ध होणार

एअरटेल आणि क्वालकॉम यांनी एकत्रितपणे 5 जी फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस नेटवर्क तयार करून होम इंटरनेट नेटवर्क अपग्रेड करण्याची योजना आखली आहे, त्याअंतर्गत ब्रॉडबँड पायाभूत सुविधा गीगाबाईट्स क्लास होम वाय-फाय नेटवर्क उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे घरी वेगवान इंटरनेट वापरता येणार आहे, ज्याद्वारे एअरटेल अन्य कंपन्यांशी स्पर्धा करण्याची योजना आखत आहे. या योजनेंतर्गत कंपनीला 5 जी सेवेत रिलायन्स जिओबरोबर स्पर्धा करायची आहे. गेल्या काही वर्षांत जिओने दूरसंचार क्षेत्रात झपाट्याने विस्तार केला आहे. आता एअरटेलला 5 जी सेवेद्वारे आपला बाजारातील हिस्सा वाढवायचा आहे. Airtel Join Hands With Qualcomm For 5g Services

संबंधित बातम्या

Airtel युजर्ससाठी खुशखबर! कंपनीकडून मोफत 6 GB का डेटा

Airtel Family Plan | एकाने रिचार्ज करा, 8 जणांना कॉलिंग आणि डेटा मिळणार

Airtel Join Hands With Qualcomm For 5g Services