Airtelचे Data Plans स्वस्तही आहेत आणि मस्तही आहेत! तुम्ही Airtel वापरत असाल, तर मग हे माहीत असायलाच हवं

Airtelचे Data Plans स्वस्तही आहेत आणि मस्तही आहेत! तुम्ही Airtel वापरत असाल, तर मग हे माहीत असायलाच हवं
Airtel

6 जीबी डाटासाठी एअरटेलच्या ग्राहकांना 108 रुपये मोजावले लागतील. पण याची खास गोष्ट म्हणजे याच्यासोबत एमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल एडीशनही मोफत मिळतंय.

शुभम कुलकर्णी

|

May 12, 2022 | 3:26 PM

मुंबई : अरेरे, मोबाईल डेटा (Mobile Data) संपला, आता काय करु? असा प्रश्न तुम्हाला यापुढे पडण्याची शक्यता कमी आहे. कारण या प्रश्नावरच जालीम उपाय एअरटेलने (Airtel News Data Plans) शोधून काढला आहे. एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी नवे आकर्षक प्लॅन्स घेऊन आलंय. यामुळे भविष्यात डेटाची कटकट संपणार आहे. एअरटेलनं आपल्या युजर्ससाठी खास गिफ्ट 19 रुपयांत दिलंय. 19 रुपयांपासून सुरु होणारे एअरटेलचे डाटा प्लॅन्स 301 रुपयांपर्यंत आहेत. एकूण सात प्लॅन्स एअरटेलनं शेअर केले आहेत. या प्लॅन्समुळे आता ब्रेकलेस डाटा ग्राहकांना वापरता येऊ शकेल. अनेकदा लिमिटेड डाटामुळे (Limited Data) ग्राहकांना दिवसभराचा डाटा संपला की काय करायचं, असा प्रश्न सतावत होता. त्यावर आता एअरटेलनं अखेर उत्तर शोधून काढलंय. एअरटेलनं जारी केलेल्या कोणत्या प्लॅनची खासियत काय आहे, हे जाणून घेऊयात…

सगळ्यात स्वत 19 रुपये वाला प्लॅन

हा एअरटेलचा सगळ्यात स्वस्त प्लॅन आहे. 19 रुपयांत 1 जीबी डाटा ग्राहकांना मिळतोय. या वॅलिडिटी एक दिवसाची आहे. या रिचार्जमुळे छोटी-मोठी अडललेली इंटरनेटची कामं तर निश्चितच होऊन जातील. पण मग मोठी कामं करायची असतील, तर मग काय? तर त्यावरही उत्तर आहे…

58 रुपयांचा डाटा प्लॅन

58 रुपयांत एअरटेल तीन जीबी डेटा देता. याची खासियत 19 रुपयांच्या प्लान पेक्षा भारी आहे. कारण 59 रुपयांचा जर रिचार्ज केला, तर हा डेटा प्लॅन तुमचं एक्टीव प्लॅन संपेपर्यंत वापरता येतो. त्यामुळे याचा ऍडऑन फायदा ग्राहकांना मिळतो.

98 रुपयांचा डेटा प्लॅन

58 रुपयांचा चाळीस रुपयांनी महाग असलेल्या या डाटामध्ये 2 जीबी जास्त डेटा मिळतो. 98 रुपयांत एकूण 5 जीबी डेटा ग्राहकांसाठी भारीच गोष्ट आहे. कारण हे पाच जीबी एक्टीव प्लॅन सुरु असेपर्यंत ग्राहकांना वापरायला मिलणार आहे. या सोबतच एक प्रीमियम सर्विसही एअरटेल आपल्या ग्रहाकांना मोफत देतं. याचं नावं आहे Wynk Music Premium

108 रुपयांचा डाटा

6 जीबी डाटासाठी एअरटेलच्या ग्राहकांना 108 रुपये मोजावले लागतील. पण याची खास गोष्ट म्हणजे याच्यासोबत एमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल एडीशनही मोफत मिळतंय. या डेटा प्लॅनसह Wynk music आणि फ्री हॅलोट्यूनही ग्राहकांना मिळतात.

118 रुपयांचा डेटा प्लॅन

118 रुपयांचा डेटा प्लॅन जास्त तगडा आहे. यात 12 जीबी डेटा ग्राहकांना मिळतोय. पण यात ना ऍमेझॉन प्राईम व्हिडीओचं मोबाईल एडीशन मिळत, नाही इतर प्रीमियम सर्विस.

148 रुपयांचा डेटा प्लॅन

148 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये युजर्सला 15 जीबी डेटा मिळतोय. याशिवाय युजर्स महिन्याभरासाठी Airtel Xstream देखील मोफत पाहू शकतो. ग्राहकांना यामुळे मोफत Hoichoi, ErosNow आणि ManoranaMax ही वापरता येऊ शकेल.

301 रुपयांचा तगडा प्लॅन

301 रुपयांचा सगळ्यात मोठा आणि महाग डेटा प्लॅनही एअरटेल घेऊन आली आहे. 50 जीबी इतका डेटा या प्लॅनमध्ये ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये Wynk Music Premium सर्विस अगदी मोफत देण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें