Amazon Great Republic Day Sale ची जबरदस्त ऑफर; फक्त 1130 रुपयांत आणा 52 हजारांचा स्मार्ट टीव्ही

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमधून वेगवेगळ्या कंपन्यांच्या टीव्हीवर आपल्याला किती सूट मिळू शकते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:07 PM, 21 Jan 2021
Amazon Great Republic Day Sale ची जबरदस्त ऑफर; फक्त 1130 रुपयांत आणा 52 हजारांचा स्मार्ट टीव्ही

नवी दिल्लीः आपण स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही एक चांगली संधी आहे. ज्यात आपण बंपर सूटसह हाय-डेफिनेशन टीव्ही खरेदी करू शकता. आपण हा टीव्ही 20 जानेवारीपासून सुरू झालेल्या Amazon च्या ग्रेट रिपब्लिक डे सेलमधून खरेदी करू शकता. या सेलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचा टीव्ही मोठ्या सवलतीत मिळेल. जाणून घेऊया Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमधून वेगवेगळ्या कंपन्यांच्या टीव्हीवर आपल्याला किती सूट मिळू शकते. (Amazon Republic Day Sale Get 43 Inch Smart Tv By Paying Just Rs 1130)

54 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा 43 इंचाचा टीव्ही
Amazon च्या सेलमध्ये आपण एकेएआयचा नवीन 43 इंचाचा टीव्ही 54 टक्के सूटसह खरेदी करू शकता. या टीव्हीची किंमत Amazon वर 51,990 रुपये निश्चित केली गेली आहे, जो टीव्ही आपण फक्त 23,999 रुपयात घरी आणू शकता. यासह, आपल्याला या टीव्हीवर ईएमआयचा पर्याय देखील मिळेल आणि दरमहा केवळ 1,130 रुपये देऊन आपण तो खरेदी करू शकता.

30,399 रुपयांमध्ये 50 इंचाचा टीव्ही खरेदी करा
Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये आपण AmazonBasicsवर 50 इंचाचा 4K के अल्ट्रा एचडी टीव्ही खूपच चांगल्या किमतीला खरेदी करू शकता. या टीव्हीवर कंपनी 46 टक्के सवलत देत आहे. यानंतर आपण ते फक्त 30,399 रुपयांत घरी आणू शकता. यासह ईएमआयचा पर्याय देखील देण्यात येत आहे आणि आपण हा टीव्ही मासिक हप्त्यात 1,431 रुपयांत खरेदी करू शकता.

40 इंचाचा टीव्ही 19,999 रुपयांमध्ये खरेदी करा

शाओमी एक असा ब्रँड आहे, ज्यांचे उत्पादन लोकांना खूप आवडते आणि ही कंपनी नेहमीच आपल्या उत्पादनांवर ऑफर देत असते. कंपनी रिपब्लिक डे सेलमध्ये आपल्याला 40 इंचाच्या एमआय टीव्ही 4 K वर बंपर सवलत देखील देत आहे. यामध्ये तुम्हाला फक्त 19,999 रुपयांमध्ये फुल एचडी अँड्रॉइड टीव्ही मिळेल. याशिवाय तुम्ही हा टीव्ही मासिक हप्त्यात 941 रुपयांवरही खरेदी करू शकता. याशिवाय ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्ही AmazonBasicsचा 32 इंचाचा अँड्रॉइड टीव्ही 13,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याद्वारे एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणार्‍या ग्राहकांना 10 टक्के त्वरित सूटही दिली जात आहे.

संबंधित बातम्या

चीटिंग करणाऱ्या युजर्सना PUBG चा दणका, 12 लाख अकाऊंट्स बॅन

लाँचिंगपूर्वीच FAU-G चा विक्रम, 40 लाखांहून अधिक युजर्सकडून गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन

Amazon Republic Day Sale Get 43 Inch Smart Tv By Paying Just Rs 1130