AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AirDrop ते सिरी…; Apple चे नवीन अपडेट लाँच, iPhone युजर्सची चांदी, एकाच रात्रीत बदलले नियम

ॲपलने WWDC 2026 मध्ये नवीन iOS 27 लाँच केले असून यामुळे एअरड्रॉपचा वेग ८० टक्क्यांनी तर ॲप्सचा स्पीड ३० टक्क्यांनी वाढणार आहे. जाणून घ्या नवीन सिरी ॲप आणि चाइल्ड लॉक फीचरबद्दल सविस्तर.

AirDrop ते सिरी...; Apple चे नवीन अपडेट लाँच, iPhone युजर्सची चांदी, एकाच रात्रीत बदलले नियम
apple
| Updated on: Jun 09, 2026 | 7:57 AM
Share

तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘ॲपल’च्या बहुप्रतिक्षित ‘WWDC 2026’ (वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स) या वार्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच पार पडला. भारतीय वेळेनुसार सोमवारी रात्री १०.३० वाजता कंपनीचे सध्याचे सीईओ टिम कुक यांच्या भाषणाने या परिषदेची सुरुवात झाली. या वर्षी कंपनीने हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या नवनिर्मितीवर आणि युजर्सचा अनुभव अधिक सुलभ करण्यावर विशेष भर दिला आहे. ॲपलने या कार्यक्रमात नवीन iOS 27 ऑपरेटिंग सिस्टमचे लाँचिंग केले. त्यामुळे आता आयफोनमधील अॅप्स ३० टक्के वेगाने चालणार आहेत.

‘iOS 27’ चे दमदार आगमन; ॲप्स ३०% वेगाने चालणार

ॲपलने या कार्यक्रमात नवीन iOS 27 ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली. यामुळे आयफोन आणि आयपॅडचा परफॉर्मन्स मोठ्या प्रमाणावर सुधारेल. तसेच सर्व ॲप्स पूर्वीपेक्षा ३० टक्के अधिक वेगाने सुरु होतील. तसेच, होम स्क्रीनवरील पेजेस स्क्रोल करतानाचा ॲनिमेशनही अनुभव अधिक सुरळीत करण्यात आले आहे. ही नवीन iOS 27 ची अपडेट आयफोन ११ आणि त्यानंतरच्या सर्व पुढील मॉडेल्सना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

एअरड्रॉप आता ८० टक्के फास्ट

त्यासोबतच आता अॅपलने युजर्सला एक मोठा दिलासाही दिला आहे. ॲपलने एअरड्रॉप (AirDrop) तंत्रज्ञानात अपग्रेडेशन केले असून आता एअरड्रॉपचा वेग ८० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. ज्यामुळे मोठ्या फाईल्स, फोटो आणि व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात शेअर करता येणार आहे. याशिवाय, आयपॅड आणि एक्स्टर्नल स्टोरेजमधील फाईल ट्रान्सफरचा वेग ५ पटीने वाढवला आहे, ज्याचा मोठा फायदा व्यावसायिक व्हिडीओ एडिटर्स आणि क्रिएटर्सना होणार आहे.

मॅक ओएस आता ‘गोल्डन गेट ओएस

मॅक वापरकर्त्यांसाठी कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम ‘गोल्डन गेट ओएस’ जाहीर केली आहे. यामध्ये युझर इंटरफेस अधिक आकर्षक करण्यासाठी लिक्विड ग्लास स्लायडर आणि विंडोसारखा टायटल बार देण्यात आला आहे. यामुळे वेगवेगळ्या व्हर्च्युअल डेस्कटॉप्स किंवा स्पेसेसमध्ये नेव्हिगेट करणे अधिक सुटसुटीत होणार आहे.

तसेच १३ वर्षांखालील मुलांच्या सुरक्षित डिजिटल वापरासाठी ॲपलने खास ‘चाइल्ड अकाउंट’ हे फीचर आणले आहे. हे फीचर मुलाच्या वयानुसार संपूर्ण सिस्टमचे सुरक्षा मापदंड आपोआप सेट करेल. याद्वारे १८ वर्षांच्या वरील वेबसाईट्स पूर्णपणे ब्लॉक होतील आणि त्या मुलांना केवळ वयाला योग्य असलेली सामग्रीच दिसेल. या पॅरेंटल कंट्रोलमुळे पालकांना आपल्या मुलांच्या डिजिटल हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाईल.

नव्या रूपात अवतरली ‘सिरी’

ॲपलने आपल्या व्हर्च्युअल असिस्टंट ‘सिरी’मध्येही बदल केले आहेत. आता नवीन सिरी अधिक संवादात्मक (Conversational) झाली असून युजर्स आता तिच्याशी माणसाप्रमाणे नैसर्गिक आणि सतत संवाद साधू शकणार आहेत. यासाठी कंपनीने एक स्वतंत्र ‘सिरी ॲप’ देखील बाजारात आणले आहे. ॲपलच्या या नव्या घोषणांमुळे तंत्रज्ञान जगतात कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून, नेहमीप्रमाणे या वर्षीही कंपनीने युजर्सची सुरक्षा आणि गती या दोन्ही आघाड्यांवर बाजी मारली आहे.

विशेष म्हणजे, टिम कुक यांचा ॲपलचे सीईओ म्हणून हा शेवटचा कार्यक्रम आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात ते आपल्या पदावरून पायउतार होणार असून, त्यांच्या जागी जॉन टर्नर कंपनीचे नवीन सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील. टर्नर हे २००१ पासून ॲपलमध्ये कार्यरत असून, आयफोन, आयपॅड आणि मॅक सारख्या लोकप्रिय उत्पादनांच्या निर्मितीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा