काय सांगता… 20 हजारांत क्लास मोबाईल हवाय… ही घ्या एकाहून एक 5G स्मार्टफोनची लिस्ट

Samsung Galaxy M33 5G 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. याशिवाय Samsung Galaxy M33 5G मध्ये 5nm ऑक्टा-कोर Exynos प्रोसेसर आहे. Samsung Galaxy M33 5G ला 8 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये चार मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे.

काय सांगता... 20 हजारांत क्लास मोबाईल हवाय... ही घ्या एकाहून एक 5G स्मार्टफोनची लिस्ट
काय सांगता... 20 हजारांत क्लास मोबाईल हवाय... ही घ्या एकाहून एक 5G स्मार्टफोनची लिस्टImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 3:37 PM

सध्या भारतात 5G नेटवर्कची (5G network) अजून चाचपणी सुरु झालेली आहे. अद्याप 5G नेटवर्क कधी सुरु होणार याची माहिती नाही. परंतु असे असले तरी, बऱ्याच मोबाईल निर्मात्या कंपन्यांनी आतापासून 5G नेटवर्कला ॲक्सेस देणारे 5G स्मार्टफोन (Smartphone) बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. जास्तीत जास्त 5G फोन्सची विक्रीदेखील केली जात आहे. त्यामुळे साहजिकच 5G स्मार्टफोनची संख्या वाढली आहे. भारतीय बाजारपेठेतील पहिला 5G फोन सुमारे 40,000 रुपयांच्या रेंजमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यामुळे हा महागडा स्मार्टफोन (Expensive smartphones) प्रत्येकाला परवडेलच असे नाही. त्यामुळे याची रेंज कमी करण्यासाठी अनेक मोबाइल निर्मात्या कंपन्यांनी बजेटमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करुन दिले आहेत. आता तुम्हाला 15,000 रुपयांच्या रेंजमध्ये 5G फोन देखील उपलब्ध आहे. जर तुम्हालाही 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल. तर या लेखामध्ये तुम्हाला 20,000 रुपयांच्या रेंजमधील स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत.

Realme 9 SE 5G

Realme 9 5G SE च्या 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 19,999 रुपये आहे आणि 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 22,999 रुपये आहे. यात 1080×2412 पिक्सेलचे रिझोल्यूशन आणि 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा फुल HD+ डिसप्ले आहे. डिसप्लेची ब्राइटनेस 600 nits असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर 8 GB पर्यंत LPDDR4X रॅमसह 5 GB पर्यंत एक्सपांडेबल रॅम मिळेल. Realme 9 5G SE मध्ये तीन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेंस 48 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेंस मोनोक्रोम आहे आणि तिसरी लेंस मॅक्रो आहे.

Redmi Note 11 Pro+ 5G

Redmi Note 11 Pro + 5G च्या 6 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 20,999 रुपये आणि 8 GB रॅम 128 GB स्टोरेजची किंमत 22,999 रुपये आहे. 8 GB आणि 256 GB फोनची किंमत 23,999 रुपये आहे. Redmi Note 11 Pro + 5G मध्ये ड्युअल सिम सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ AMOLED डिसप्ले आहे. ज्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे आणि ब्राइटनेस 1200 nits आहे. यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर आहे, 8GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज आहे.

हे सुद्धा वाचा

Samsung Galaxy F23 5G

Samsung Galaxy F23 5G च्या 4 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची किंमत 17,499 रुपये आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 18,499 रुपये आहे. फोन एक्वा ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. Samsung Galaxy F23 5G मध्ये Android 12 आधारित One UI 4.1 आहे. Galaxy F23 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + इन्फिनिटी डिसप्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, 6GB पर्यंत रॅम आणि 6GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमसह 128GB पर्यंत स्टोरेज आहे.

POCO M4 5G

Poco चा Poco M4 5G हा भारतातील सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचे बोलले जात आहे. Poco M4 5G च्या 6 GB रॅमसह 64 GB स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. त्याच वेळी, 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 14,999 रुपये आहे. Poco M4 5G ड्युअल रियर कॅमेरे आणि MediaTek Dimensity 700 प्रोसेसरसह भारतात लाँच करण्यात आला आहे.

iQoo Z6 5G

iQoo Z6 5G च्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजची किंमत 15,499 रुपये आहे. 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 16,999 रुपये आणि 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजची किंमत 17,999 रुपये आहे. iQoo Z6 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह डिसप्ले आहे. याशिवाय iQoo च्या या फोनमध्ये फाइव्ह-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम आहे जी फोनला थंड ठेवते.

Motorola Moto G71

Moto G71 5G सध्या 17,999 मध्ये उपलब्ध आहे. Moto G71 5G सोबत स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. Moto G71 5G मध्ये 30K टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगसाठी समर्थन असलेली 5000mAh बॅटरी पॅक करते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, Moto G71 5G मध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 50 मेगापिक्सेल आहे.

Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 5G 120Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. याशिवाय Samsung Galaxy M33 5G मध्ये 5nm ऑक्टा-कोर Exynos प्रोसेसर आहे. Samsung Galaxy M33 5G ला 8 GB रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळेल. फोनमध्ये चार मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. Samsung Galaxy M33 5G चे 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज सध्या 19,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकतात.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.