DRDO: पायलट शिवाय ‘फायटर एअरक्राफ्ट’ चे उड्डाण; टेस्टमध्येच टेकऑफपासून लॅंडींगपर्यंतचे यशस्वी नियंत्रण विमानाकडेच…

ज्यामध्ये टेकऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन यांचाही यामध्ये समावेश होता. हे विमान पुढील पायलटविरहित विमानाच्या टप्प्यातील हे विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. स्वावलंबनाच्या दिशेनेही हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही म्हटले आहे.

DRDO: पायलट शिवाय 'फायटर एअरक्राफ्ट' चे उड्डाण; टेस्टमध्येच टेकऑफपासून लॅंडींगपर्यंतचे यशस्वी नियंत्रण विमानाकडेच...
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 9:21 PM

नवी दिल्लीः ‘फायटर एअरक्राफ्ट’ (fighter aircraft) या विमानाची खासियत ही आहे की, हे विमान पायलटशिवाय उड्डाण करणार आहे, फक्त एवढेच नाही तर हे विमान टेकऑफपासून ते लॅडींगपर्यंतचे सगळे नियंत्रण हे स्वतःविमानच करणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (Defence Research and Development Organisation) अत्याधुनिक मानवरहित विमान विकसित करण्यात मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे डीआरडीओकडून स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरचे (Autonomous Flying Wing Technology Demonstrator)पहिले उड्डाण यशस्वीरित्या पारही पाडले आहे.

या उड्डाणाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पायलटशिवाय उड्डाण करू शकते तेवढेच नाही तर टेकऑफपासून ते लँडिंगपर्यंतची सर्व कामे कोणाच्याही मदतीशिवाय स्वत: हाताळू शकणार आहे.

एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर यशस्वी सराव

डीआरडीओकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर शुक्रवारी हा सराव करण्यात आला.

टेस्ट उड्डाणात यशस्वी उड्डाण

मानवरहित एरियल व्हेईकल (UAV) हे ‘ऑटोनोमस फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर’ म्हणूनही ओळखले जाते. या विमानाबाबत अधिक माहिती देताना संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, हे विमान पूर्णपणे स्वायत्त पद्धतीने चालवले जाणार असून टेस्ट उड्डाण केलेल्या या विमानाने यशस्वी उड्डाणही केले आहे.

विकासातील मैलाचा दगड

ज्यामध्ये टेकऑफ, वे पॉइंट नेव्हिगेशन यांचाही यामध्ये समावेश होता. हे विमान पुढील पायलटविरहित विमानाच्या टप्प्यातील हे विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे. स्वावलंबनाच्या दिशेनेही हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही म्हटले आहे.

विमानाने घेतले स्वतःहून उड्डाण

या विमानाबाबत एएनआय दिलेल्या वृत्तानुसार डीआरडीओच्या निवेदनात म्हटले आहे की, या विमानाने यशस्वीपणे उड्डाण केले आहे, त्यासाठी लागणारा सरावही करण्यात आला आहे. या विमानाची झालेली निर्मिती धोरणात्मक पद्धतीने झाली असून संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे विमान एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, बेंगळुरू यांच्याकडून डिझाइन आणि विकसित केले आहे.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.