Flipkart Sale : Realme च्या ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 6000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट्स

फ्लिपकार्टच्या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. या सेलमध्ये प्रामुख्याने Realme च्या स्मार्टफोन्सवर मोठ्या डिस्काऊंट ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत.

Flipkart Sale : Realme च्या 'या' 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 6000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट्स
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 6:39 PM

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग करणारे ग्राहक फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलची वाट पाहात असतात. कंपनीने नुकतीच या सेलची घोषणा केली आहे. 3 ऑक्टोबरपासून हा सेल फ्लिपकार्ट अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह होणार आहे. दरम्यान, फ्लिपकार्टच्या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर सवलत मिळेल. यात अनेक लोकप्रिय फोन समाविष्ट करण्यात आले आहेत. या सेलमध्ये प्रामुख्याने Realme च्या स्मार्टफोन्सवर मोठ्या डिस्काऊंट ऑफर्स सादर करण्यात आल्या आहेत. (Flipkart Big Billion Days sale : Huge Discount Realme Smartphones including Realme 8i, Realme 8 5G)

या लिस्टमध्ये तुम्हाला Realme 8i, Realme C21Y, Realme C25Y, Realme Narzo 30 5G, Realme 8, Realme 8 5G, Realme C20, Realme GT 5G, Realme GT ME आणि Realme C21 वर सूट मिळू शकते. याशिवाय, क्रेडिट आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक ऑफर्स प्रदान करण्यात आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या स्मार्टफोनवर किती रुपयांची सूट मिळतेय.

  • Realme 8i हा स्मार्टफोन 15999 रुपयांऐवजी 12999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme C21Y हा स्मार्टफोन 10999 रुपयांऐवजी 8999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme C25Y हा स्मार्टफोन 13999 रुपयांऐवजी 10999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme Narzo 30 5G हा स्मार्टफोन 15999 रुपयांऐवजी 14999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme 8 हा स्मार्टफोन 17999 रुपयांऐवजी 15999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme 8 5G हा स्मार्टफोन 18999 रुपयांऐवजी 17499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme C20 हा स्मार्टफोन 7999 रुपयांऐवजी 6999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme GT 5G हा स्मार्टफोन 40999 रुपयांऐवजी 35999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme GT ME हा स्मार्टफोन 26999 रुपयांऐवजी 20999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • Realme C21 हा स्मार्टफोन 10999 रुपयांऐवजी 9499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

कसा आहे Realme C25Y?

आपल्या एंट्री-लेव्हल सी-सीरीजचा विस्तार करत, स्मार्टफोन ब्रँड Realme ने गेल्या महिन्यात एक नवीन फोन-Realme C25Y लॉन्च केला, जो 50 मेगापिक्सेल AI- बेस्ड ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. Realme C25Y दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Realme C25Y हा 4 GB रॅम + 64 GB आणि 4 GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 50 मेगापिक्सेल मोड देणारा Realme C सिरीजमधील पहिला फोन आहे. Realme C25Y क्लियर फोटो शूटिंग ऑफर करतो. ज्यामुळे युजर्सना 8160 x 6144 पर्यंत मोठ्या पिक्सेल इमेज कॅप्चर करता येतात, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

एआय ब्यूटी फंक्शनसह स्मार्टफोन 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा पॅक ऑफर करतो, ज्यामुळे उत्कृष्ट आणि परफेक्ट सेल्फी फोटो शूट करणे सोपे होते. हा स्मार्टफोन 6.5 इंचाचा डिस्प्ले आणि 88.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्योसह युनिसॉक टी 610 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. ग्राफिक्स ARM माली G52 GPU द्वारे हाताळले जातात, ज्याचं क्लॉक स्पीड 614.4 MHz आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh रेटेड बॅटरी आहे, जी स्टँडबाय मोडमध्ये 48 दिवस टिकू शकते. तसेच 18W क्विक चार्जला सपोर्ट करते. हा फोन फिंगरप्रिंट अनलॉकिंग आणि फेशियल रिकग्निशनसह येतो, जो युजर्सची प्रायव्हसी कायम ठेवतो.

कसा आहे Realme C21Y?

रियलमी C21Y हा लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सी सीरीजच्या फोनसारखाच आहे. C21Y लाइट वापरकर्त्यांसाठी एक उत्तम फोन आहे. त्याच वेळी, जे लोक फीचर फोनवरून स्मार्टफोनवर स्विच करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा फोन एक उत्तम पर्याय आहे. गेल्या महिन्यात व्हिएतनाममध्ये Realme C21Y लाँच करण्यात आला होता. एंट्री लेव्हल स्मार्टफोन असूनही, यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, यात आय प्रोटेक्शन फीचरचाही समावेश आहे. Realme C21Y TUV Rheinland प्रमाणित डिस्प्ले वापरते, जो हाय ब्राईटनेस, व्हाइट लाइट आणि आय प्रोटेक्शन फीचरसह येतो.

हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉल ब्लॅक रंगात येतो. Realme C21Y हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिम कार्ड आणि 4G VoLTE सह येतो. यात अँड्रॉइड 10 आधारित Realme यूआय सॉफ्टवेअर देखील आहे. Realme आधीच अधिकाधिक स्मार्टफोनमध्ये Android 11 देत आहे. फोनमध्ये Octa core Unisoc T610 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी LPDDR4x रॅम आहे, जो 64 जीबी स्टोरेजसह येतो. त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी त्यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे.

इतर बातम्या

5000 रुपयांच्या रेंजमध्ये Itel चा ढासू स्मार्टफोन लाँच, युजर्सना फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटसह ट्रेंडी फीचर्स मिळणार

Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार

256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स

(Flipkart Big Billion Days sale : Huge Discount Realme Smartphones including Realme 8i, Realme 8 5G)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.