Smartphone Alert : सावधान, आपल्या फोनमध्ये हे 17 अॅप्स असतील तर लगेच डिलीट करा, नाहीतर लागू शकतो चुना

Smartphone Alert : सावधान, आपल्या फोनमध्ये हे 17 अॅप्स असतील तर लगेच डिलीट करा, नाहीतर लागू शकतो चुना
अॅप्स
Image Credit source: tv9

Google Play ने देखील त्यांना स्टोअरमधून काढून टाकले आहे. त्या अॅप्सबद्दल माहिती ही जाणून द्या जे हटवणे खूप महत्वाचे आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Jun 21, 2022 | 4:40 PM

Smartphone Alert : आपल्याकडे स्मार्टफोन (Smartphones) आल्यापासून अनेक स्मार्ट कामे होत आहेत. तर हातातल्या हातात चुटकीसरशी प्रोब्लेमची सोडवणूक होते. तर अनेक कामे होतात. मात्र सध्या याच स्मार्टफोन मधून अनेकांची फसवणूक होत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये डाऊनलोड (downloads) केलेले अॅप्सही तुमची फसवणूक करू शकतात. हे पाहता अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्यात किती विश्वासार्हता आहे, हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच 17 अॅप्सबद्दल (apps) सांगणार आहोत जे केवळ तुमचा डेटाच चोरत नाहीत तर तुमची वैयक्तिक माहितीही लीक करतात. PhoneArena च्या रिपोर्टनुसार, यापैकी काही अॅप्समुळे आर्थिक नुकसानही होत आहे. तुमच्या फोनमध्येही हे अॅप्स असतील तर ते लगेच डिलीट करा. काही काळासाठी, खबरदारी घेत, Google Play ने देखील त्यांना स्टोअरमधून काढून टाकले आहे. त्या अॅप्सबद्दल माहिती ही जाणून द्या जे हटवणे खूप महत्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

 1. Document Manager : हे अॅप तुमची कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्यासाठी आहे, उलट ते तुमचे दस्तऐवज लीक देखील करू शकतात.
 2. Coin Track Loan – Online Loan : हे अॅप तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात की नाही हे सांगते
 3. Cool Caller Screen : हे अॅप वापरकर्त्याला कॉलर स्क्रीन बदलण्याची परवानगी देते, त्या बदल्यात ते तुमचे नुकसान देखील करू शकते.
 4. PSD ऑथ प्रोटेक्टर: हे एक गेमिंग अॅप आहे, ते देखील त्वरित हटवणे आवश्यक आहे.
 5. RGB इमोजी कीबोर्ड : लोक हे अॅप इमोजीसाठी डाऊनलोड करतात जे धोक्याचे लक्षण आहे.
 6. Camera Translator Pro : या अॅपचा दावा आहे की कॅमेरासह जे काही स्कॅन केले जाईल ते संबंधित भाषेत भाषांतरित केले जाईल.
 7. Fast PDF Scanner : हे अॅप पीडीएफ जलद स्कॅन करण्याचा दावा करते.
 8. Air Ballon Wallpaper: हे एक अॅप आहे जे तुम्हाला वॉलपेपर बदलण्याची परवानगी देते.
 9. Colorfur Messanger: अॅपने रंगीत संदेश पाठवण्याची सुविधा देण्याचा दावा केला आहे.
 10. Thug Photo Editor: लोक फोटो संपादित करण्यासाठी या अॅपचा वापर करतात.
 11. Anime Wallpaper: हे अॅप वॉलपेपर बदलण्यासाठी देखील वापरले जाते.
 12. Peace SMS : अॅप शांती संदेश सुचवण्यासाठी कार्य करते, जेणेकरून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जाऊ शकतात.
 13. Happy Photo Collage : फोटो कोलाजसाठी लोक हे अॅप डाउनलोड करतात.
 14. Pellet Messages : Pellet Messages साठी अॅप डाऊनलोड.
 15. Smart Keyboard : कीबोर्ड स्मार्ट करण्यासाठी लोक अनवधानाने हे अॅप डाऊनलोड करतात.
 16. 4K Wallpapers : हे अॅप वॉलपेपर बदलण्यासाठी देखील वापरले जाते.
 17. Original Messangers : हे देखील एक मेसेंजर अॅप आहे. ज्याद्वारे तुमची फसवणूक केली जाऊ शकते.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें