इंस्टाग्राम रील्स पाहायला आवडतात? मग Jio चा हा प्लॅन फक्त तुमच्यासाठीच!

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Jan 21, 2023 | 10:39 AM

ज्यांच्या कार्यालयात आणि घरात वाय-फाय आहे आणि त्यांचा मोबाईल डेटा दररोज वाया जातो. अशा परिस्थितीत Jio चा हा प्लॅन (Jio Cheap Data Plan) तुमच्यासाठी योग्य आहे.

इंस्टाग्राम रील्स पाहायला आवडतात? मग Jio चा हा प्लॅन फक्त तुमच्यासाठीच!
जिओ
Image Credit source: Social Media

मुंबई, अनेक जण इंटरनेटचा वापर फक्त सोशल मिडीयासाठी करतात. अशात इंटरनेटचा महागडा प्लॅन त्यांच्या खिशाला कात्री लावणारा असतो. त्यामुळे आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही प्‍लॅनची माहिती देणार आहोत, जे दररोज 1GB डेटा देतात. या योजना अशा लोकांसाठी अतिशय योग्य आहेत ज्यांच्या कार्यालयात आणि घरात वाय-फाय आहे आणि त्यांचा मोबाईल डेटा दररोज वाया जातो. अशा परिस्थितीत Jio चा हा प्लॅन (Jio Cheap Data Plan) तुमच्यासाठी योग्य आहे. जाणून घेऊया काय आहे हा प्लॅन?

सोशल मीडिया स्क्रोलिंगसाठी सर्वोत्तम प्लॅन

जर तुम्ही तुमचा मोबाईल डेटा फक्त सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी आणि रील्स पाहण्यासाठी वापरत असाल तर Realince Jio कडे तुमच्यासाठी काही परवडणारे प्रीपेड प्लॅन आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, SMS सह दररोज 1GB डेटा मर्यादा मिळते. या प्लॅनची किंमत  200 रूपयांपेक्षा कमी आहे.

जिओचा 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

हे सुद्धा वाचा

जिओचा हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. जोपर्यंत इंटरनेट डेटाचा संबंध आहे, या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटासह एकूण 28GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होतो.

जिओचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

या प्लॅनमध्ये, 24 दिवसांच्या वैधतेसह, तुम्हाला दररोज 1GB दैनिक डेटा, दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. Jio वापरकर्त्यांना OTT सामग्रीचा आनंद घेण्यासाठी आणि त्यांच्या फाइल्स क्लाउड स्टोरेजमध्ये सेव्ह करण्यासाठी JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud वर मोफत प्रवेश देते.

जिओचा 149 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

यामध्ये युजर्सना अमर्यादित कॉलिंगसह 20 दिवसांची वैधता, दररोज 100 एसएमएस आणि 1GB दैनिक डेटा मर्यादा मिळेल. यासोबत तुम्हाला JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI