आता कमी वयातही बाईक चालवा, लायसन्सच्या नियमात मोठे बदल

आता कमी वयातही बाईक चालवा, लायसन्सच्या नियमात मोठे बदल

मुंबई : सायकल वगळता कुठलेही वाहन चालवण्यासाठी लायसन्स बंधनकारक असतं. हे लायसन्स बनवण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे लागते. तसे कायद्यान्वये बंधनकारक आहे. मात्र, आपण अनेकदा पाहतो की, लहान-लहान मुलंही हल्ली बाईकवरुन सुसाट जातात. त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नसते. मात्र, आता सरकारने लायसन्समध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकार आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरुन कमी […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : सायकल वगळता कुठलेही वाहन चालवण्यासाठी लायसन्स बंधनकारक असतं. हे लायसन्स बनवण्यासाठी किमान वय 18 वर्षे असावे लागते. तसे कायद्यान्वये बंधनकारक आहे. मात्र, आपण अनेकदा पाहतो की, लहान-लहान मुलंही हल्ली बाईकवरुन सुसाट जातात. त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नसते. मात्र, आता सरकारने लायसन्समध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

सरकार आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरुन कमी करण्याच्या तयारीत आहे. येत्या काळात ड्रायव्हिंग लायसन्ससाठीचे वय 18 वरुन 16 वर्षे केले जाऊ शकते. मात्र, त्यासाठी सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे. ती अट मान्य असेल, तरच हे लायसन्स मिळेल.

ज्या दुचाकी 50 सीसी मर्यादेच्या आहेत, त्या दुचाकी चालवण्यासाठीच 16 व्या वर्षी लायसन्स मिळू शकेल. जे तरुण-तरुणी 18 वर्षे पूर्ण नाहीत, मात्र कायद्याने दुचाकी चालवू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी सरकारचा हा बदल फायदेशीर ठरणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय यासंदर्भात अधिसूचना काढण्याची तयारी करत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 16 व्या वर्षीच जे ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल, त्याआधारे केवळ 50 सीसीच्या बाईक किंवा ई-स्कूटर चालवणं शक्य होणार आहे. शिवाय, या दुचाकींचा स्पीड प्रती तास 70 किमीपेक्षा जास्त नसावं, असाही नियम असेल. तसेच, वाहनाची इंजिन क्षमता 4.0 किलोवॅटच्या मर्यादेचं असणं बंधनकारक असेल.

केंद्रीय मंत्रालयाकडून अधिसूचना जारी झाल्यानंतर सर्व राज्य सरकार आपापल्या वाहन अधिनियम 1989 च्या नियमात तसे बदल करुन, 18 हून 16 वर्षे अशी वयाची मर्यादा परवान्यासाठी केली जाईल. त्यानंतर नवे ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल. आता केंद्रीय मंत्रालयाकडून नेमकी कधी अधिसूचना जारी केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण त्यानंतरच ड्रायव्हिंग लायसन्ससंदर्भातील नवीन नियम लागू होणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें