आता एकदाच पैसे भरा आणि वर्षभर कॉल फ्री, व्होडाफोनची ऑफर

आता एकदाच पैसे भरा आणि वर्षभर कॉल फ्री, व्होडाफोनची ऑफर

मुंबई : व्होडाफोनने आपल्या अनेक प्लॅनमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांना सर्वात उत्तम सुविधा देण्यासाठी व्होडाफोन सध्या ग्राहकांना आकर्षित करत नवीन प्लॅन बाजारात आणत आहे. आता कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे. या नवीन प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे आणि त्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची असणार आहे. म्हणजेच एक वर्षाची व्हॅलिडिटी देणारा पहिला प्लॅन व्होडाफोनने लाँच केला […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : व्होडाफोनने आपल्या अनेक प्लॅनमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांना सर्वात उत्तम सुविधा देण्यासाठी व्होडाफोन सध्या ग्राहकांना आकर्षित करत नवीन प्लॅन बाजारात आणत आहे. आता कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे. या नवीन प्लॅनची किंमत 1,499 रुपये आहे आणि त्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची असणार आहे. म्हणजेच एक वर्षाची व्हॅलिडिटी देणारा पहिला प्लॅन व्होडाफोनने लाँच केला आहे.

नवीन प्लॅनमध्ये व्होडाफोन प्ले सब्सक्रिप्शन आणि अनलिमिटेड नॅशनल रोमिंगचा समावेश आहे. हा प्लॅन पाहिला तर यामध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल आऊटगोइंग कॉल्स, रोज 100 एसएमएस आणि 1GB 3G/4G डेटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना वर्षभरासाठी तब्बल 365 जीबींचा डेटा मिळणार आहे. 1 GB डेटाची लिमिट संपल्यावर ग्राहकांना 50 पैसे प्रति MB च्या दराने पैसे भरावे लागणार आहे.

व्होडाफोनचा हा प्लॅन जिओच्या 1,699 रुपये वाल्या प्लॅनला टक्कर देत आहे. जिओच्या प्लॅनमध्ये जिओ अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स तसेच 100 एसएमएस देत आहे. तर दिवसाला 1.5 GB डेटा देत आहे.

जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटीही 365 दिवसांची आहे. तसेच येथे ग्राहकांना 547.5 GB 4G डेटा मिळत आहे. डेटाची लिमिट संपल्यानंतर या प्लॅनमध्ये 64 kbps च्या स्पीडने इंटरनेटचा वापर केला जाऊ शकतो. जिओच्या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही, जिओ मुव्हीस आणि जिओ सावन सारख्या अॅपचे अॅक्सेस दिले आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें