33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह OPPO K10 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ओप्पो इंडियाने (Oppo India) आपला शानदार स्मार्टफोन ओप्पो के 10 (Oppo K10) भारतात लॉन्च केला आहे. K10 हा ओप्पोचा भारतात लाँच झालेला पहिला K-सिरीज स्मार्टफोन आहे, जो चीनमध्ये बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. लॉन्चच्या अगोदर, Oppo ने K10 चे काही टीझर सादर केले होते.

33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह OPPO K10 लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ओप्पोचा खास फोनImage Credit source: Oppo
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 2:24 PM

मुंबई : ओप्पो इंडियाने (Oppo India) आपला शानदार स्मार्टफोन ओप्पो के 10 (Oppo K10) भारतात लॉन्च केला आहे. K10 हा ओप्पोचा भारतात लाँच झालेला पहिला K-सिरीज स्मार्टफोन आहे, जो चीनमध्ये बऱ्याच काळापासून उपलब्ध आहे. लॉन्चच्या अगोदर, Oppo ने K10 चे काही टीझर सादर केले होते. हा फोन मोठा डिस्प्ले, 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल कॅमेरा, एक्सपेंडेबल रॅम सपोर्ट आणि फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरीसह येतो. Oppo ने पुष्टी केली आहे की K10 हा 4G फोन आहे. OPPO K10 स्मार्टफोन भारतात 14,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. लिव्ह विदाऊट लिमिट्स (Live Without Limits) या टॅगलाइनसह हा फोन सादर करण्यात आला आहे.

OPPO K10 ची विक्री 29 मार्चपासून सुरू होईल. हा फोन ग्राहक Flipkart सह काही निवडक रिटेल आउटलेट्स आणि Oppo ऑनलाइन स्टोअरवरुन खरेदी करु शकतात. यासोबतच फोनच्या खरेदीवर काही उत्तम ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. तुम्ही SBI कार्डधारक असाल तर तुम्हाला फोनवर 2,000 रुपयांची सवलत मिळू शकते. फोनशी संबंधित उर्वरित ऑफर्स फ्लिपकार्टच्या वेबसाइटवरून पाहता येतील. फोनवर 3 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI ची ऑफरदेखील दिली जात आहे.

OPPO K10 चे स्पेसिफिकेशन्स

  1. फोनमध्ये 6 जीबी रॅम, 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे, जी 1 टीबी पर्यंत वाढवता येते.
  2. स्मार्टफोन 16.74 सेमी (6.59 इंच) फुल एचडी + डिस्प्लेसह येतो.
  3. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Oppo K10 च्या बॅक पॅनलवर 50MP + 2MP + 2MP चा ट्रिपल कॅमेरा उपलब्ध आहे आणि समोर 16MP कॅमेरा उपलब्ध आहे.
  4. OPPO K10 चा 16MP AI सेल्फी कॅमेरा HDR ला सपोर्ट करतो आणि ब्राइट सेल्फ-पोर्ट्रेटसाठी 360° फिल लाइटसह येतो. हा कॅमेरा व्हिडीओ, नाईट, पॅनोरामिक, पोर्ट्रेट, टाइम-लॅप्स, टेक्स्ट स्कॅनर आणि स्टिकर सारख्या मोडला सपोर्ट करतो.
  5. OPPO K10 स्मार्टफोनच्या 6+128GB व्हेरिएंटची किंमत 14,990 रुपये आणि 8+128GB व्हेरिएंटची किंमत 16,990 रुपये आहे.
  6. फोनमध्ये 33W SuperVOOC चार्जिंग फीचरसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. हा फोन 5 मिनिटांच्या चार्जिंगसह 3 तास 38 मिनिटांचा कॉलिंग टाईमसह येतो.
  7. OPPO K10 च्या पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात पॉवरफुल Qualcomm® Snapdragon™ 680 प्रोसेसर आहे जो युजर्सना सर्वोत्तम अनुभव देतो. या फोनमध्ये 5G सपोर्ट मिळणार नाही.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.