SBI चं जुनं डेबिट कार्ड 31 डिसेंबरपूर्वी बंद होणार, नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ करा

भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही मॅग्नेटिक स्ट्राईपचे SBI एटीएम कार्ड वापरत असाल, तर तातडीने नवीन एटीएम कार्ड बदलून (SBI change ATM card features) घ्या.

SBI चं जुनं डेबिट कार्ड 31 डिसेंबरपूर्वी बंद होणार, नुकसान टाळण्यासाठी 'हे' करा

मुंबई : भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. जर तुम्ही मॅग्नेटिक स्ट्राईपचे SBI एटीएम कार्ड वापरत असाल, तर तातडीने नवीन एटीएम कार्ड बदलून (SBI change ATM card features) घ्या. नव्या एटीएम कार्डमध्ये सेफ ईएमव्ही चीप देण्यात आली आहे. हे कार्ड बदलून घेण्यासाठी बँकेने ग्राहकांना 31 डिसेंबर 2019 पर्यंतची मुदत (SBI change ATM card features) दिली आहे.

“आरबीआयच्या मार्गदर्शक सुचनेनुसार SBI ने आपले सर्व मॅग्नेटिक स्ट्राईपचे कार्ड ईएमव्ही चीप आणि पिन बेस कार्डमध्ये बदलून घेतले आहेत. मॅग्नेटिक स्ट्राईप डेबिट कार्डला सेफ ईएमव्ही चीप कार्ड आणि पिन बेस SBI कार्ड घेण्यासाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या SBI शाखेत अर्ज करावा”, असं ट्वीट बँकेने केले आहे. एटीएम आणि स्वाईप मशीनच्या माध्यमातून कार्ड क्लोनिंगच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे आरबीआयने मॅग्नेटिक कार्ड ईएमव्ही चीपमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. ईएमव्ही चीपच्या कार्डमधून क्लोनिंगची शक्यता कमी आहे. त्यामुळे ग्राहकांच्या कार्डची सुरक्षा वाढणार आहे.

“मॅग्नेटिक कार्ड बदलून घेण्यासाठी ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही. हे मोफत आणि ऑनलाईन किंवा आपल्या जवळच्या शाखेतही बदलून मिळेल. जर यासाठी कुणी तुमच्याकडून पैसे घेत असेल, तर तातडीने बँकेत संपर्क करा”, असंही SBI च्या ट्वीटमध्ये सांगितले आहे.

इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही ग्राहक सेफ ईएमव्ही चीपसाठी अर्ज करु शकता. अर्ज करण्याआधी तुमच्या घरचा पत्ता अपडेट असणे गरजेचे आहे. कारण रजिस्टर पत्त्यावर कार्ड पाठवले जाईल. तर ऑनलाई अर्ज करताना मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे.

Published On - 8:29 pm, Tue, 3 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI