रात्री मिळणार सूर्यप्रकाश, एका स्टार्टअपने बनवला असा चमत्कारीत प्लॅन

लंडनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना बेन नोवाक यांनी सांगितले की, आता उर्जासाठी दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा प्रकाश उपलब्ध होणार आहे. हा पर्याय अजेय शक्ती ठरणार आहे. मानवतेसाठी हा पर्याय मैलाचा दगड ठरणार आहे.

रात्री मिळणार सूर्यप्रकाश, एका स्टार्टअपने बनवला असा चमत्कारीत प्लॅन
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 6:25 PM

सूर्याचा प्रकाश सकाळी मिळतो. रात्री सर्वत्र अंधार असतो. परंतु रात्रीसुद्धा सूर्यप्रकाश मिळाला तर? तुम्ही म्हणाला हे कसे शक्य आहे. परंतु हा चमत्कार एका स्टार्टअपने केला आहे. यामुळे रात्री चंद्र ऐवजी सूर्याची किरणे चमकणार आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील स्टार्टअप कंपनी रिफ्लेक्ट ऑर्बिटल (Reflect Orbital) अंतराळात उपग्रह सोडून त्या माध्यमातून सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर आणण्याची योजना बनवली आहे. दिवसा हा उपग्रह सूर्यप्रकाश संग्रहीत करेल अन् रात्रीच्या वेळी तो पृथ्वीवर पाठवणार आहे.

सनलाइट ऑन डिमांड

रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीची योजना अंतराळात उपग्रह लॉन्च करण्याची आहे. त्या माध्यमातून सूर्यप्रकाश पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. रिफ्लेक्ट ऑर्बिटलचे सीईओ बेन नोव्हाक यांनी सांगितले की, सूर्य दिवसाच नाही तर रात्रीसुद्धा तुम्हाला प्रकाश देणार आहे. या योजनेला नाव “सनलाइट ऑन डिमांड” दिले आहे. यामुळे सूर्य प्रकाश दिवसा आणि रात्रीच्या बंधनातून मुक्त होणार आहे.

57 लहान उपग्रह पाठवणार

लंडनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना बेन नोवाक यांनी सांगितले की, आता उर्जासाठी दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा प्रकाश उपलब्ध होणार आहे. हा पर्याय अजेय शक्ती ठरणार आहे. मानवतेसाठी हा पर्याय मैलाचा दगड ठरणार आहे. त्यासाठी जवळपास 57 लहान उपग्रह लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. हे उपग्रह 600 किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करणार आहे.

हे सुद्धा वाचा

सात जणांच्या टीमकडून काम

स्टार्टअपमध्ये सात जणांची टीम या योजनेवर काम करत आहे. या स्टार्टअपने त्यासाठी लागणारी चाचणी पूर्ण केली आहे. आता 2025 मध्ये उपग्रह अवकाशात पाठवण्याची योजना बनवली जात आहे. या कंपनीचे को-फाउंडर आणि सीईओ बेन नोव्हाक आहे. दुसरे को-फाउंडर आणि सीटीओ त्रिस्टन सेमेलहॅक आहे.

रिफ्लेक्ट ऑर्बिटलची ही कल्पना चमत्कारासारखी आहे. यापूर्वी रशियानेही हा प्रयोग केला आहे. 1992 मध्ये रशियाने झानाम्या 2 मोहीम सुरू केली होती. त्यासाठी रशियाने अंतराळात एक आरसा बसवला होता. त्या माध्यमातून काही वेळ पृथ्वीच्या दिशेने सूर्यप्रकाश आला होता. तथापि, या यशाची पुनरावृत्ती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले नाही. कारण त्या वेळी उपग्रह अवकाशात पाठवणे खूप महाग होते.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.