उद्या 7 ते 10 टीव्ही बंद, केबल व्यावसायिक आक्रमक

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’च्या जाचक अटींविरोधात केबल व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. उद्या (27 डिसेंबर) आणि परवा (28 डिसेंबर) संध्याकाळी 7 ते रात्री 10 असे तीन तास टीव्ही बंद ठेवून, ‘ट्राय’चा निषेध नोंदवला जाणार आहे. नव्या वर्षांत ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य बहाल करतानाच आणखीही जाचक अटी घातल्याचा केबल चालकांचा आरोप आहे. महाराष्ट्रातील […]

उद्या 7 ते 10 टीव्ही बंद, केबल व्यावसायिक आक्रमक
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’च्या जाचक अटींविरोधात केबल व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. उद्या (27 डिसेंबर) आणि परवा (28 डिसेंबर) संध्याकाळी 7 ते रात्री 10 असे तीन तास टीव्ही बंद ठेवून, ‘ट्राय’चा निषेध नोंदवला जाणार आहे. नव्या वर्षांत ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य बहाल करतानाच आणखीही जाचक अटी घातल्याचा केबल चालकांचा आरोप आहे.

महाराष्ट्रातील केबल चालक व मालकांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी या पत्रकार परिषदेतून केबल व्यावसायिकांना ज्या अटींचा त्रास होतोय, त्याबद्दल माहिती दिली. 28 डिसेंबरला स्टार कंपनीवर केबल चालक-मालक मोर्चा काढणार असल्याची आमदार परब यांनी माहिती दिली.

‘टीव्ही 9 मराठी‘ फ्री टू एअर चॅनल आहे. हे चॅनल तुम्ही मोफत पाहू शकता. विविध कंपन्यांच्या डिशच्या माध्यमातून या क्रमांकावर तुम्ही हे चॅनल पाहू शकता.

काय आहे नवीन पद्धत?

ट्रायने सांगितले आहे की, ग्राहकांवर आपण विशिष्ट कोणते टीव्ही चॅनल पाहण्यासाठी जबरदस्ती करु शकत नाही. ग्राहकांना आता त्यांच्या आवडीनुसार चॅनल पाहण्याचे स्वातंत्र दिले आहे. मात्र यामध्ये ग्राहकांना त्यांनी निवडलेले टीव्ही चॅनल फक्त पाहता येणार आहे आणि ज्या चॅनलचे पैसे ग्राहकांनी दिलेले असतील. तसेच सर्व चॅनल्स वेगवेगळ्या किंमतीत उपलब्ध आहेत.  इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड (EPG) द्वारे टीव्हीवर प्रत्येक चॅनलची किंमत दिसेल. कोणताही डिस्ट्रीब्यूटर ब्रॉडकास्टकडून ठरवलेल्या किंमतीपेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाही.

प्रत्येक महिन्याला खर्च किती?

ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 100 चॅनलसाठी 130 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही 100 पेक्षा अधिक चॅनल बघत असाल तर नंतरच्या 25 चॅनेलसाठी अतिरिक्त 20 रुपये घेतले जातील. याशिवाय तुम्ही जो चॅनल निवडणार त्याची किंमत तुमच्या बीलमध्ये जोडली जाईल. TRAI च्या नुसार चॅनलची किंमत ही 1 ते 19 रुपयांमध्ये असेल.

मोफत चॅनलही मिळणार

TRAI ने सर्व सेवा प्रदान करणाऱ्यांना सुचना दिली आहे की, ग्राहकांना फ्री टु एअर (FTA) चॅनेल पूर्णपणे मोफत दाखवावे लागतील. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही पैस आकारायचे नाही. मात्र सर्व FTA चॅनेल देणे अनिवार्य नसून ते ग्राहकांवर अवलंबून आहे त्याना कोणते चॅनल पाहिजे आहेत. मात्र दुरदर्शनचे सर्व चॅनल्स दाखवणे अनिवार्य असेल.

Non Stop LIVE Update
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.