2018 मधील पाच बेस्ट अॅप

2018 मधील पाच बेस्ट अॅप

मुंबई : सध्याच्या डिजीटल युगात मोठ्या प्रमाणात मोबाईल युजर्सची संख्या वाढली आहे. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे अॅप्स आहेत. ज्यामध्ये मेसेजिंग, गेम्स, फोटो, व्हिडिओ, मॅप्स सारखे इतर अॅप्सचा समावेश असतो. मात्र त्यामधील सर्वच अॅप्स आपल्या पसंतीस उतरत नाहीत, काही ठारवीकच अॅप्स आपल्याला आवडतात. दरवर्षी अनेक अॅप लाँच केले जातात. त्यातले नेमकेच अॅप युजर्सच्या पसंतीस पडतात. […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:48 PM

मुंबई : सध्याच्या डिजीटल युगात मोठ्या प्रमाणात मोबाईल युजर्सची संख्या वाढली आहे. आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे अॅप्स आहेत. ज्यामध्ये मेसेजिंग, गेम्स, फोटो, व्हिडिओ, मॅप्स सारखे इतर अॅप्सचा समावेश असतो. मात्र त्यामधील सर्वच अॅप्स आपल्या पसंतीस उतरत नाहीत, काही ठारवीकच अॅप्स आपल्याला आवडतात. दरवर्षी अनेक अॅप लाँच केले जातात. त्यातले नेमकेच अॅप युजर्सच्या पसंतीस पडतात. असे काही अॅप 2018 मध्ये बेस्ट ठरले आहेत.

PicsArt Photo Studio

फोटो काढणे सर्वांना आवडते. सध्या फोटोची क्रेझही वाढली आहे. प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये उत्तम असे फोटो काढतो. पण काही फोटो थोडे खराब येतात, अशावेळी फोटो अॅपच्या माध्यमातून एडिटिंग केली जाते. यासाठी सध्या पिक्सआर्ट अॅपला युजर्स सर्वाधिक पसंती देत आहेत. या अॅपद्वारे एखादा फोटो उत्तम एडिटिंग करुन सुंदर असा बनवण्यात येतो.

Dark Sky

हवामानाबद्द्लची माहिती देणारं Dark Sky अॅप आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही तापमानाची माहिती घेऊ शकता. त्यासोबतच काही नैसर्गिक आपत्ती येणार असेल तर सर्वात पहिली माहिती तुम्हाला दिली जाते. सध्या या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

Spotify

गाणं ऐकायला प्रत्येकाला आवडते. पण फोनमध्ये स्टोरेजची मर्यादा असल्यामुळे जास्त गाणी भरता येत नाहीत. मात्र स्पॉटिफाय अॅपद्वारे तुम्ही ऑनलाईन गाणी ऐकू शकता. या अॅपमध्ये लेटेस्ट सर्व गाण्यांचा समावेश असतो.

WhatsApp Messenger

व्हॉट्सअॅप आज जगातील सर्वात जास्त वापरला जाणारा मेसेजिंग अॅप ठरला आहे. कारण या अॅपच्या मदतीने आपण मेसेज, कॉल, व्हिडिओ कॉल, स्टीकर्स, इमोजी आणि इतर गोष्टी सहज करु शकतो. हा अॅप यावर्षीचा पहिल्या क्रमांकाचा अॅप ठरला आहे. लवकरच या अॅपमध्ये नवीन फीचर येणार आहेत.

Fitbit

आजच्या काळात आरोग्यदायी जीवन मिळणे, फिट राहणे आव्हान आहे. पण फिट राहण्यासाठी काय खावे, कसे रहावे, आहार कसा असावा अशा अनेक प्रश्नांनी तो गोंधळून जातो. या सर्वातून फिट राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणार फिटबिट अॅप आहे. आरोग्यदायी जीवनासाठी हा अॅप खूप मदत करतो.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें