365 दिवसांची वैधता असलेल्या BSNLच्या ‘या’ किंमतीच्या प्लॅनमध्ये मिळेल दररोज इतका डेटा
जर तुम्ही 365 दिवसांच्या वैधतेसह स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तेही 3000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला प्लॅन शोधताय, तर तुमच्यासाठी बीएसएनएल कंपनीचा हा कमी किमतीत उत्तम फायदे देणारा प्लॅन सर्वोत्तम ठरेल. चला तर मग या प्लॅनची किंमत आणि फायदे जाणून घेऊयात.

तुम्हाला दर महिन्याचा रिचार्ज करण्याचे टेन्शन येत असेल आणि त्यात तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण बीएसएनएलने तुमच्यासाठी 365 दिवसांचा कमी किमतीचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलकडे 2 हजार 799 रुपयांचा एक उत्तम रिचार्ज प्लॅन आहे, जो कमी किमतीत 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन केवळ कमी किमतीत दीर्घ वैधताच देत नाही, तर दररोज 3 जीबी डेटादेखील देतो. दुसरीकडे पाहिले तर जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियासारखी कोणतीही खाजगी दूरसंचार कंपनी 3000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 365 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन देत नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात.
हे फायदे बीएसएनएल 2799 प्लॅनमध्ये उपलब्ध
या 2799 रुपयांच्या प्लॅनबद्दल बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स (X) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये प्लॅनचे फायदे सांगितले
आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. 365 दिवसांची वैधता आणि दररोज 3 जीबी डेटासह, हा प्लॅन एकूण 1095 जीबी हाय-स्पीड डेटा देतो.
जिओच्या 365 दिवसांच्या प्लॅनची किंमत बीएसएनएलपेक्षा जास्त
जिओच्या 365 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनची किंमत 3 हजार 599 रूपये आहे, पण जास्त किंमत असूनही, यात बीएसएनएलच्या तुलनेत कमी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. डेटा मर्यादा कमी असली तरी, यात तीन महिन्यांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल आणि 35 हजार 100 रूपयांचा किंमतीच्या गूगल जेमिनी प्रोचा ॲक्सेस देखील मिळतो. याव्यतिरिक्त तुम्हाला 5 हजार जीबी गूगल क्लाउड स्टोरेजचाही लाभ मिळेल. या प्लॅनसोबत अनलिमिटेड 5 जी डेटाचे फायदेही मिळतात.
एअरटेलचे प्लॅन अधिक महाग
एअरटेलकडे 365 दिवसांच्या वैधता असलेल्या प्लॅनची किंमत 3 हजार 599 रुपये इतकी आहे, पण या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या प्लॅनसोबत अनलिमिटेड 5जी, ॲडोबी एक्सप्रेस प्रीमियम, दर 30 दिवसांनी एकदा मोफत हॅलोट्यून, स्पॅम कॉल आणि एसएमएस ब्लॉकिंग, आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचा मोफत ॲक्सेस यांसारखे अतिरिक्त फायदेही मिळतात.
ही गोष्ट लक्षात ठेवा
बीएसएनएल कंपनीचा प्लॅन सर्वात स्वस्त आहे कारण या प्लॅनमध्ये कोणतेही अतिरिक्त फायदे उपलब्ध नाहीत, तर जिओ आणि एअरटेलसारख्या खाजगी कंपन्या ग्राहकांना डेटा, कॉलिंग आणि एसएमएस व्यतिरिक्त अतिरिक्त फायदे देत आहेत.