64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन बाजारात

या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यापैकी 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 29,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे

64 MP रियर, 44MP सेल्फी कॅमेरासह Vivo चा 5G फोन बाजारात
Vivo V21 5G
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 9:16 PM

मुंबई : Vivo कंपनीने गेल्या आठवड्यात भारतात Vivo V21 5G स्मार्टफोन लॉन्च केला होता. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशनबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीने 800U SoC सह आपला लेटेस्ट मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन आता फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. (Vivo V21 5G with 8 GB RAM, 64 MP rear andd 44 MP selfie camera, sale live on Flipkart on 6th May)

हा 5 जी स्मार्टफोन विवोचं सर्वात पातळ डिव्हाइस आहे ज्याची जाडी 7.29 मिमी इतकी आहे. हे डिव्हाइस 90 हर्ट्झच्या एमोलेड डिस्प्लेसह येतं. हे डिव्हाइस सर्वात आधी (27 एप्रिल रोजी) मलेशियात लाँच करण्यात आलं होते. त्यानंतर, 29 एप्रिल रोजी Vivo V21 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला. हा स्मार्टफोन 6.44-इंचाचा ई 3 एमोलेड डिस्प्लेसह डिय्रूडॉप नॉच, 800 निट्स पीक ब्राइटनेस आणि एचडीआर 10 प्लस सपोर्टसह सादर करण्यात आला आहे.

Vivo V21 5G ची कीमत

या स्मार्टफोनमध्ये दोन स्टोरेज ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यापैकी 8GB + 128GB वेरिएंटची किंमत 29,990 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या Vivo V21 ची किंमत 32,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन डस्क ब्लू, सनसेट डॅझल आणि आर्क्टिक व्हाइट कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून या फोनची विक्री केली जाणार आहे. हा फोन उद्यापासून (6 मे) फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Vivo V21 चे स्पेसिफिकेशन्न

  • Vivo V21 5G मध्ये 20: 9 आस्पेक्ट रेश्यो असलेला 6.44-इंचांचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये HDR10 + सपोर्टसह 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल.
  • हा स्मार्टफोन 44MP OIS फ्रंट कॅमेरा आणि वाटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह येतो. हा सेल्फी कॅमेरा आय ऑटोफोकससह येतो. Vivo V21 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडरही आहे.
  • फोनच्या मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये OIS सह 64 MP चा प्रयमरी सेंसर आहे. फोन 8 एमपी अल्ट्रावाइड शूटर आणि 2 एमपी मॅक्रो युनिटसह येतो.
  • या डिव्हाईसमध्ये एक मीडियाटेक डाइमेन्सिटी 800U SoC प्रोसेसर आहे जो 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो.
  • फोन 33W फास्ट-चार्जिंग सपोर्ट आणि 4,000 एमएएच बॅटरीसह येतो. हा फोन अँड्रॉयड 11 आधारित फनटच ओएस 11.1 वर चालतो.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये 4 जी, 5 जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, माइक्रोएसडी कार्ड स्लॉट आणि अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात आले आहेत.
  • Vivo V21 5G मध्ये एक्सटेंडेड रॅम फीचरही देण्यात आलं आहे. ज्यामुळे हा फोन रॅमच्या रुपात 3 जीबी एक्स्ट्रा मेमरी स्पेसचा वापर करण्याची परवानगी देतो.

इतर बातम्या 

64MP कॅमेरासह Redmi चा पहिला गेमिंग स्मार्टफोन लाँच, किंमत…

8GB/128GB, 48MP क्वाड कॅम, 5000mAh बॅटरी, Samsung चा किफायतशीर 5G स्मार्टफोन लाँच

6000mAh बॅटरी, 108MP कॅमेरा, Moto G60 आणि Moto G40 चा सेल सुरु

(Vivo V21 5G with 8 GB RAM, 64 MP rear andd 44 MP selfie camera, sale live on Flipkart on 6th May)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.