WhatsApp साठी इंटरनेटची गरज नाही, जाणून घ्या ट्रिक
तुम्हाला जर इंटरनेटशिवाय व्हॉट्सॲप वापरायचं असेल तर पटकन ही ट्रिक ट्राय करा. या ट्रिकमुळे तुम्ही कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हॉट्सॲपवर चॅटिंग करू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त एक छोटीशी ट्रिक फॉलो करावी लागेल.

आजच्या आधुनिक जगात संवाद साधण्यासाठी तसेच एकमेकांच्या संपर्कात राहण्याच्या माध्यमांमध्ये अनेक बदल झाले आहेत. यामध्ये मित्र, कुटुंबीय, नातेवाईक यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी व्हॉट्सॲपचा वापर सार्वधिक केला जातो. यात व्हॉट्सॲपला युजर्सची विशेष पसंती मिळत आहे. कोणत्याही स्मार्टफोनवरून WhatsApp चा वापर करण्यासाठी इंटरनेट असणे आवश्यक असते, इंटरनेटशिवाय व्हॉट्सॲप वापरता येत नाही.
मात्र इंटरनेटशिवाय तुम्ही कोणालाही व्हॉट्सॲप मेसेज पाठवू शकता. ऑफलाइन राहून सुद्धा तुम्हाला व्हॉट्सॲपवर चॅटिंग करता येणार आहे. यासाठी तुम्हाला वाय-फाय किंवा इतर कोणत्याही इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज भासणार नाही. येथे आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही डेटाशिवाय मेसेज पाठवू आणि रिसिव्ह करू शकता. हे फीचर मेटावरच उपलब्ध असेल. तुम्हाला इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर जावे लागणार नाही.
अशा पद्धतीने व्हॉट्सॲप इंटरनेटशिवाय काम करेल
- इंटरनेटशिवाय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप चालवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा. यासाठी तुम्ही प्रॉक्सी फीचरचा वापर करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या लॅपटॉप आणि डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप वेब वापरू शकता.
- प्रॉक्सी फीचरचा फायदा घेण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रॉक्सी फीचर इनेबल करा. ॲप प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट करा, पण त्या दरम्यान तुमचा फोन इंटरनेटशी कनेक्ट नसलेला हवा, हे लक्षात ठेवा.
- प्रॉक्सी फीचर वापरल्याने तुमच्या प्रायव्हसी आणि सिक्युरिटीवर परिणाम होत नाही. तुमचे मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड देखील राहतात. तुम्ही थर्ड-पार्टी प्रॉक्सी वापरत असल्यास, तुमचा IPॲड्रेस प्रोवाइडर सोबत शेअर केला जाऊ शकतो.
- लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सॲप चालवायचं असेल तर गुगलवर वेब व्हॉट्सॲप सर्च करा. त्यानंतर स्कॅनरचा वापर करून तुमचा फोन कनेक्ट करा. आता फोनचे इंटरनेट बंद असले तरी व्हॉट्सॲप काम करत राहील.
Proxy फीचर अशा प्रकारे इनेबल करा
तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा. उजव्या बाजूला असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करा. सेटिंग्जमध्ये जा. असे केल्यानंतर Storage&Data सिलेक्ट करा. येथे तुम्हाला Proxyचा पर्याय दिसेल. आता Proxy Adress प्रविष्ट करा आणि तो सेव्ह करा. प्रॉक्सी ॲड्रेस सेव्ह होईल आणि तुम्हाला एक हिरवा ठिपका दिसेल. हे सूचित करते की तुमचा Proxy Adress कनेक्ट झाला आहे.




Proxy Adress कनेक्ट करून सुद्धा कॉल किंवा मेसेज करता येत नसेल तर हे करा.
प्रॉक्सी फीचर ऑन केल्यानंतरही कॉल किंवा मेसेज सर्व्हिस काम करत नसेल तर काळजी करू नका. इंटरनेटशिवाय मेसेज आणि कॉल पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला Proxy Adress लॉन्ग प्रेस करून काढून टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा एक नवीन Proxy Adressतयार करावा लागेल. मात्र Proxy Adress विश्वासार्ह स्त्रोतातूनच क्रिएट करावा लागेल हे लक्षात ठेवा.
या संपूर्ण ट्रिक्स तुम्ही फॉलो करून इंटरनेटशिवाय whatsapp वर मेसेज कॉल करू शकता. तुम्ही जेव्हा बाहेर फिरायला जात तेव्हा नेटवर्क प्रॉब्लेम असेल नेट चालत नसेल तर ही ट्रिक्स नक्कीच तुमच्या कामाला येईल.