आता WhatsApp ला करावे लागणार नाही डिलीट; लवकरच येणार जबरदस्त फीचर्स

WABetaInfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपवरून लवकरच 'डिलीट माय अकाऊंट' हा पर्याय हटविला जाईल.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:42 PM, 18 Feb 2021
आता WhatsApp ला करावे लागणार नाही डिलीट; लवकरच येणार जबरदस्त फीचर्स
Whatsapp

नवी दिल्लीः व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी आणखी एक फीचर्स घेऊन येणार आहे. ज्यात अ‍ॅपमधून सहजपणे लॉगआऊट करणे शक्य होणार आहे. हे नवीन फीचर सादर झाल्यानंतर कंपनी ‘डिलीट माय अकाऊंट’ हा पर्याय हटवणार आहे. आता वापरकर्त्यांना अ‍ॅपमधून काही दिवसांचा ब्रेक हवा असल्यास त्यांच्याकडे केवळ अ‍ॅप हटविण्याचा पर्याय आहे. यात हे नवीन फीचर्स वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकते आणि ते त्यातून लॉगआऊट करू शकतात आणि जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा ते वापरणे टाळू शकतात. (Whatsapp To Roll Out Sign Out For Its Ios And Android Users Know More About It)

WABetaInfo च्या अहवालानुसार व्हॉट्सअ‍ॅपवरून लवकरच ‘डिलीट माय अकाऊंट’ हा पर्याय हटविला जाईल. सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये हे नवे बदल करण्यात आलेत. हे फीचर लॉन्च झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस दोन्हीसाठी उपलब्ध असेल. Android आणि iOS दोन्ही वापरकर्ते याचा वापर करण्यास सक्षम असतील.

मल्टी डिव्हाइस सपोर्टवर देखील काम करणार

यासह व्हॉट्सअॅप मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचरवरही काम करणार आहे. या नवीन फीचर्ससह वापरकर्ते एकाच वेळी अधिकाधिक डिव्हाइसवर खाते वापरण्यास सक्षम असतील. गेल्या महिन्यात कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटला संगणकाशी जोडण्यासाठी एक एडिशन प्रोटेक्शन लेयर जोडला होता. जेव्हा वापरकर्ते संगणकावर त्यांचे खाते चालविताना क्यूआर कोड स्कॅन करत होते, तेव्हा त्यांना फिंगरप्रिंट किंवा फेसलॉकचा पाठिंबा मिळत होता, ज्यामुळे त्यांचे खाते अधिक सुरक्षित झाले होते.

व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी 15 मेपासून लागू

गेल्या महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने आपली गोपनीयता बदललीय, त्यामुळे बरीच गडबड झालीय आणि त्याला विरोध केला जात आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणीही सुरू आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने कंपनीला ही पॉलिसी मागे घेण्यास सांगितले. कंपनी सातत्याने सांगत आहे की, नवीन पॉलिसीने वापरकर्त्यांच्या डेटाला कोणताही धोका नाही आणि व्हॉट्सअ‍ॅप 15 मे 2021 पासून याची अंमलबजावणी करण्याची योजना आखत आहे.

संबंधित बातम्या

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

WhatsApp Privacy Policy | तुमच्या माहितीवर व्हॉट्सअपचा अधिकार, नव्या गोपनियता नियमांमध्ये मोठे बदल

Whatsapp To Roll Out Sign Out For Its Ios And Android Users Know More About It