WhatsApp वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोबाईल नंबर नसला तरी चॅटिंग करता येणार, कंपनी आणणार खास फीचर

स्मार्टफोन वापरणारे जवळपास सर्वच लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मेटा कंपनी ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. आता आगामी काळात व्हॉट्सअॅपमध्ये एक महत्त्वाचे फीचर जोडले जाणार आहे.

WhatsApp वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मोबाईल नंबर नसला तरी चॅटिंग करता येणार, कंपनी आणणार खास फीचर
whatsapp new feature
| Updated on: Oct 06, 2025 | 4:03 PM

स्मार्टफोन वापरणारे जवळपास सर्वच लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मेटा कंपनी ग्राहकांसाठी सतत नवनवीन फीचर्स आणत असते. आता आगामी काळात व्हॉट्सअॅपमध्ये एक महत्त्वाचे फीचर जोडले जाणार आहे. यात इंस्टाग्रामप्रमाणे युजर्सनेम तयार करता येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे एखाद्याचा नंबर नसला तरी त्याच्यासोबत चॅटिंग करता येणार आहे. कंपनी या फीचरवर गेल्या काही काळापासून काम करत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

युजरनेम फीचर

WABetaInfo ने अलिकडेच एक अहवाल सादर केला आहे. यानुसार युजरनेम फीचर अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.28.12 अपडेटमध्ये दिसले आहे. याचा एक स्क्रीनशॉट समोर आला आहे. यात युजर्सना त्यांच्या व्हॉट्सअॅप प्रोफाइल सेटिंग्जमध्ये युजर्सनेम फीचर पाहता येणार आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनेम तयार करता येते, त्याचप्रमाणे आता व्हॉट्सअॅपवर युजर्सनेम तयार करता येणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार युजरनेम तयार करताना काही अटींचे पालन करावे लागणार आहे. युजर्सनेम ‘www’ ने बनवता येणार नाही. कारण यामुळे एखाद्या अधिकृत वेबसाइटबद्दल गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच युजर्सनेममध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे. त्यातबरोबर संख्या आणि अंडरस्कोअर्सचाही वापर करता येणार आहे.

बीटा टेस्टिंग सुरु

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार या फीचरवर काम सुरु आहे. सध्या त्याची बीटा टेस्टिंग सुरु आहे. मात्र ते Google Play बीटा प्रोग्राममध्ये रजिस्टर केलेल्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध नाही. रिपोर्टनुसार हे फीचर आगामी काळात इतर बीटा युजर्ससाठी उपलब्ध करुन दिले जाण्याची शक्यता आहे.

सिक्युरिटी फीचरही येणार

त्याचबरोबर व्हॉट्सअॅपमध्ये Meta लवकरच एक नवीन सुरक्षा फीचर जोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे युजर्सना नको ते मेजेस रोखता येणार आहेत. यासाठी युजर्स आपल्या प्रोफाइलसाठी युजरनेम आणि पिन सेट करू शकणार आहेत. युजर्सना युजरनेम तयार करण्याचा आणि ते रिझर्व करण्याचाही पर्याय मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात व्हॉट्सअॅपमध्ये मोठे बदल पहायला मिळणार आहेत.