नवी दिल्ली: आधी जे तंत्रज्ञान अत्यंत महागडं असतं नंतर ते अत्यंत स्वस्त होतं. पण त्यावेळी त्या तंत्रज्ञानाची क्रेझ प्रचंड असते. जेव्हा ती वस्तू हातात अन् रोजच्या जीवनातील भाग बनते तेव्हा तिची क्रेझ कमी होऊन जाते. मोबाईलही त्यापैकी एक. मोबाईल आला तेव्हा तो प्रचंड महागडा होता. वजनदार होता. वायरलेस होता. त्याची किंमतही खूप होती. त्यामुळे एवढ्याश्या मोबाईलमधून दूरवरच्या माणसासोबत बोलता येतं याची त्याकाळी प्रचंड क्रेझ होती. शिवाय मोबाईल जवळ असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जात होतं. आज मात्र, मोबाईल लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत आणि गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांकडे आहे. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.