शाओमी रेडमी 6 प्रोच्या किंमतीत पहिल्यांदाच भरघोस कपात

मुंबई : शाओमीने आणखी एका स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. रेडमी 6 प्रो या स्मार्टफोनची किंमत पहिल्यांदाच कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता. नव्या किंमतीसह हा फोन 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. अमेझॉन किंवा शाओमीच्या वेबसाईटवर हा फोन उपलब्ध आहे. रेडमी 6 प्रो भारतात 10 […]

शाओमी रेडमी 6 प्रोच्या किंमतीत पहिल्यांदाच भरघोस कपात
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

मुंबई : शाओमीने आणखी एका स्मार्टफोनची किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. रेडमी 6 प्रो या स्मार्टफोनची किंमत पहिल्यांदाच कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता. नव्या किंमतीसह हा फोन 9999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. अमेझॉन किंवा शाओमीच्या वेबसाईटवर हा फोन उपलब्ध आहे.

रेडमी 6 प्रो भारतात 10 हजार 999 रुपयांसह लाँच करण्यात आला होता. 3GB रॅम व्हेरिएंटची ही किंमत आहे. दुसरं व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेजचं आहे. या व्हेरिएंटची किंमत 12999 रुपये होती. एक हजार रुपये कपातीसह हे व्हेरिएंट आता 11999 रुपयांमध्ये मिळेल.

गेल्या एक ते दीड वर्षांपासून शाओमीचे फोन अत्यंत लोकप्रिय झाले आहेत. सॅमसंगसारख्या कंपन्यांना शाओमीने अडचणीत आणलंय. भारतीय बाजारावर शाओमीने पकड मजबूत केली आहे. त्यातच किंमतीमध्ये कपात करुन ग्राहकांना पुन्हा एकदा आकर्षित केलं जातंय.

रेडमी 6 प्रोमध्ये 5.84 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसरवर हा फोन काम करतो. शाओमीच्या कॅमेराचा अनुभव आतापर्यंत तरी चांगला आहे. या फोनमध्येही 12 मेगापिक्सल प्रायमरी आणि दुसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे. अशा पद्धतीने ड्युअल कॅमेरा या फोनमध्ये मिळेल. तर 5 सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

या स्मार्टफोनचं बॅटरी बॅकअप चांगलं असल्याचं बोललं जातंय. 4,000mAh क्षमतेची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. शाओमीने काही दिवसांपूर्वीच Mi A2 आणि Redmi Note 6 Pro या फोनचीही किंमत कमी केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.