Video: एक बाईक, 9 प्रवासी, पेट्रोल डिझेलच्या किंमतीने परेशान व्यक्तीचा भन्नाट जुगाड!

व्हिडिओमध्ये एक पुरुष मोटरसायकल चालवत आहे, ज्यावर एक लाकडी फळी आहेत आणि त्यावर महिला आरामात बसलेल्या दिसत आहेत.

Video: एक बाईक, 9 प्रवासी, पेट्रोल डिझेलच्या किंमतीने परेशान व्यक्तीचा भन्नाट जुगाड!
1 बाईक 9 प्रवासी
Follow us
| Updated on: Nov 06, 2021 | 7:28 AM

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींचा सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच भार पडतो आहे. पण असं असलं तरी भारतीयांकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे. भारतभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत असताना, कारपूलिंग आणि सार्वजनिक वाहतूक पैशांची बचत करत आहेत. एका व्यक्तीने कारपूलिंग सोल्यूशन किंवा ‘देसी जुगाड’ आणला, ज्याने नेटिझन्सला वेड लावले. मध्य प्रदेश काँग्रेसचे आमदार जयवर्धन सिंह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. (A biker carrying 9 passengers on a bike. Desi Jugaad Video Viral)

माणसाच्या देसी जुगाडने सर्वांनाच हैराण केले व्हिडिओमध्ये एक पुरुष मोटरसायकल चालवत आहे, ज्यावर एक लाकडी फळी आहेत आणि त्यावर महिला आरामात बसलेल्या दिसत आहेत. तो ग्रामीण भागात दोन, तीन नव्हे तर नऊ प्रवासी रस्त्याने नेतो आहे. गाडीचा वेगही चांगला आहे. या व्यक्तीचं बाईक चालवण्याचं कौशल्यही भन्नाट आहे, कारण तो एवढ्या लोकांचं वेड्यावाकड्या रस्त्यावरही बॅलंसिंग करतो आहे. बाईकचा पुढचा भाग पाहिल्यावर त्यात पाच महिला आणि चार मुले बसल्याचे दिसते

पाहा व्हिडीओ:

इंटरनेटवर आलेला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला

बाईकवर असलेल्या कोणीही हेल्मेट घातलेले नसल्यामुळे आणि एकाच दुचाकीवर अनेक लोक असल्याने ते वाहतूक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करत असून अपघाताला बळी पडण्याची शक्यता आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओ पाहिल्यानंतर असा जुगाड किंवा वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नये असाच सल्ला देण्यात आला आहे.

हेही पाहा:

‘हेरा फेरी’मधल्या ‘राजू’ची साईड पोज पुन्हा व्हायरल, नेटकऱ्यांमध्ये साईड पोझ फोटोचा ट्रेंड सुरु!

महिनाभरानंतर भेटल्यावर अनुपम खेर यांच्या आईने त्यांना शिव्या का घातल्या? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ

 

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.