फुकट दिला तरी घालणार नाही, अश्या फाटक्या ‘Fully Destroyed’ बुटाची किंमत 1 लाख 42 रूपये!, काय आहे प्रकार वाचा सविस्तर…

फुकट दिला तरी घालणार नाही, अश्या फाटक्या 'Fully Destroyed' बुटाची किंमत 1 लाख 42 रूपये!, काय आहे प्रकार वाचा सविस्तर...

Balenciaga या प्रसिद्ध कंपनीने बाजारात नेव शूज आणलेत. पण हे शूज जरा हटके आहेत. हे बुट पाहताना अगदी जुनाट वाटतात. खराब झाले म्हणून जे बुट आपण फेकतो तसे हे बुट या कंपनीने बाजार आणलेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 12, 2022 | 7:17 PM

मुंबई : सध्या वेगवेगळ्या फॅशनचा ट्रेंड पाहायला मिळतो. वेगवेगळे हटके आणि ट्रेंडी वस्तू सध्या बाजारात उपलब्ध आहेत. पण काही फॅशन ब्रॅण्ड अगदीच हटके आणि वेगळ्या गोष्टी तयार करतात. आताही अश्याच एका हटके गोष्टीची चर्चा (viral news) होतेय. ती गोष्ट म्हणजे बुट! आता तुम्ही म्हणाल एखाद्या कंपनीने नवे बुट बाजारात आणले तर त्याची चर्चा करण्यासारखं काय आहे? तर जरा थांबा हे बुट नेमके कसे आहेत आणि त्याची किंमत किती आहे. हे जरा पाहा… Balenciaga या प्रसिद्ध कंपनीने बाजारात नवे शूज (Fully Destroyed) आणलेत. पण हे शूज जरा हटके आहेत. हे बुट पाहताना अगदी जुनाट वाटतात. खराब झाले म्हणून जे बुट आपण फेकतो तसे हे बुट या कंपनीने बाजार आणलेत. याची किंमतही तितकीच आकषर्णाचा विषय ठरलीये. याची किंमत आहे, 1 लाख 42 रूपये!

Balenciaga च्या या नवीन कलेक्शनला ‘Paris Sneaker’ असं नाव देण्यात आलं आहे. हा स्पॅनिश फॅशन ब्रँड त्याच्या टॉप कलेक्शनसाठी नेहमीच चर्चेत असतो. कधी स्वेटर तर कधी बेल्टचे विचित्र प्रकार बाजारात आणून ही कंपनी चर्चेच्या केंद्रस्थानी असते. यावेळी त्याचे कलेक्शन जे चर्चेत आहे ते म्हणजे Balenciaga शूज, जे शूज कमी आणि कचरा जास्त दिसत असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

हे सुद्धा वाचा

Balenciagaच्या ‘Paris Sneaker’ कलेक्शनमधील शूजही खूप सारी व्हारायटी पाहायला मिळते. हे वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहेत . सर्वात कमी किमतीचे शूज देखील चर्चेत आहेत. त्याची किंमत $495 म्हणजेच भारतीय चलनात 38,208 रुपये ते $625 म्हणजे भारतीय चलनात 48,243 रुपये आहेत. जर एखाद्याला पूर्णपणे फाटलेले शूज हवे असतील तर त्याला £1,290 म्हणजेच सुमारे 1 लाख 42 हजार रुपये खर्च करावे लागतील.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें