Video : लग्नाच्या दिवशी जीवाशी खेळ! कपड्यांना आग, नवरा-नवरीची खतरनाक स्टंट…

Video : लग्नाच्या दिवशी जीवाशी खेळ! कपड्यांना आग, नवरा-नवरीची खतरनाक स्टंट...
अशा प्रकारच्या जीवघेण्या स्टंटचं टीव्ही9 मराठी समर्थन करत नाही!

या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 1800 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. यावर काही नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 13, 2022 | 5:54 PM

मुंबई : लग्नाच्या दिवशी सगळे काही निट घडावं, कोणतंही विघ्न येऊ नये, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. त्यासाठी सगळे प्रयत्नही करत असतात. पण काहींनी आपल्या लग्नात काही हटके काही करण्याची इच्छा असते. जेणे करून हे लग्न सगळ्यांच्याच लक्षात राहिल. त्यासाठी ते अश्याच काही हटके गोष्टी करतात. काहींना स्टंट करण्याची आवड असते. त्यामुळे ते त्यांच्या लग्नातही असंच हटके काही करण्याचा प्रयत्न करतात.असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडला आहे. यात काहीतरी वेगळं करण्यासाठी वधू-वरांनी (Bride And Groom Video) एक स्टंट केलाय. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा (Viral Video) आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. यात नवरा-नवरी स्टंग करताना दिसत आहेत. लग्नाच्या वेळी फोटो आणि व्हीडिओ शूट सुरू असल्याचं दिसतंय. यावेळी या दोघांनी जाणीवपूर्वक स्वतःला पेटवून घेतल्याचं दिसतंय. असंच अंगावरचे कपडे जळत असताना हे दोघे पळताना दिसत आहेत. शेवटी ते एकेठिकााणी जाऊन थांबतात मग त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारण्यात येतो. अन् हा स्टंट आणि व्हीडिओ संपतो.

हा व्हीडिओ Destination Wedding या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. डीजे आणि वेडिंग फोटोग्राफर रॉस पॉवेल यांनी टिकटॉकवर पोस्ट केलेल्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये वधू आणि वर स्टंट करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हीडिओला ‘जेव्हा दोन स्टंट करणारी माणसं लग्न करतात’, असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

या व्हीडिओला हजारो लोकांनी पाहिलंय. तर 1800 पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. यावर काही नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. एक म्हणालाय की, “किती तो आगीशी खेळ! जीवावर बेतलं तर महागात पडेल” “आतापर्यंत लग्नाचे खूप व्हीडिओ पाहिले पण हा असा खतरनाक व्हीडिओ पहिल्यांदाच पाहातोय. बघतानाही अंगावर काटा येतोय “, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

टीप- अशा प्रकारच्या जीवघेण्या स्टंटचं टीव्ही9 मराठी समर्थन करत नाही!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें