13 तास प्रवास करून ती आली… हॉटेलमध्ये शिरताच हादरली… नको तो प्रकार… काय आहे प्रकरण ?
सुट्टी घालवण्यासाठी मजल दरमजल करून, प्रवास करून बेथनी हंट आली पण तिची सुट्टी जणू एखादं दु:स्वप्नच ठरलं. 13 तासांच्या प्रवासानंतर ती बूक केलेल्या हॉटेलमध्ये पोहोचली पण तिथे पोहोचताच तिच्यासोबत जे घडलं...

सुट्टी, हॉलिडेचं नाव काढताच आपल्या चेहऱ्यावर हसू येतं. रोजच्या धकाधकीच्या, त्याच रूटीनमधून वेळ काढून आराम करण्यासाठी आपण सगळेच कधी ना कधी सुट्टीवर जात असतो. नवं शहरं, नव्या गल्ल्या, नवं वातावरण, खाणं-पिणं आणि रिलॅक्स होण्याचं नाव म्हणजे सुट्टी, कधी कुटुंबासोबत , मित्र-मैत्रिणींसोबत तर कधी एकटंच सुट्टीवर जाणं हे स्ट्रेसबस्टर ठरू शकतं. पण बऱ्या कालावधीनंतर, वेल काढून आपण सुट्टीवर गेलो आणि ते एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे ठरलं तर ? विचार करा काय होईल ? असंच काहीस झालं बेथनी हंट हिच्यासोबत , जी खरंतर मजा करायला, रिलॅक्स व्हायला सुट्टीवर गेली होती, पण तीच सुट्टी तिच्यासाठी अतिशय भयानक अनुभव ठरली. एक असं स्वप्न होतं जे विसरणंच तिला उत्तम वाटलं.
त्याच बेथनी हंटने तिची भयानक कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे, ब्लॅकपूलच्या एका हॉटेलमध्ये तिने बूकिंग केलं होतं, पण त्याच हॉटेलमध्ये गेल्यावर तिला असा काही अनुभव आला की ते वाचूनच थरकाप उडवे, स्वप्नातही तुम्ही अशा गोष्टीची तकल्पना करू शकणार नाही..
नेमकं झालं तरी काय ?
खरं तर, बेथानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने नमूद केलं की, तिने ब्लॅकपूलमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या अर्नक्लिफ हॉटेलमध्ये राहण्यासाठी ऑनलाइन बुकिंग केलं होतं. हे हॉटेल ब्लॅकपूलमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ मानले जाते. पण जेव्हा ती तिथे पोहोचली, तेव्हा तिला विचित् अनुभव आला. 13 तासांच्या प्रवासानंतर ती त्या हॉटेलजवळ पोहोचली खरी पण तिथले दरवाजे बंद होते, खिडक्या अंधारात बुडालेल्या होत्या आणि आजूबाजूला एकही कर्मचारी नव्हता. द मिररच्या वृत्तानुसार, बेथानीने खुलासा केला की तिने हॉटेलमध्ये आधीच ईमेल करून बुकिंग कन्फर्म केलं होतं, कारण तिथे पोहोचण्यासाठी तिला 13 तासांचा बस प्रवास करावा लागणार होता. तेव्हा तिच्या ईमेलवर हॉटेलद्वारे उत्तरही आलं होतं, “सर्व ठीक आहे, तुमची खोली तयार असेल.” असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र ती खरोखर जेव्हा तिथे पोहेचली तेव्हाचं दृश्य अतिशय बयानक होतं. ते हॉटेल पूर्णपणे रिाकमं होतं,तिथे कोणीचं रहात नव्हतं, अनेक लोकं, लहान मुलांसह पावसातच बाहेर उभे होतं, असं तिला दिसलं आणि मोठा धक्का बसला.
पैसे घेऊन हॉटेलवाले फरार
त्यानंतर बेथनीनेन जे सांगितलं ते आणखीनच धक्कादायक होतं, तिला तिथल्या काही स्थानिक लोकांनी सांगितलं की हॉटेल मालक “सर्वांचे पैसे घेऊन पळून गेला आहे” आणि हा फक्त त्या दिवशीचा प्रकार नव्हता तर गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तेच हॉटेल अजूनही Booking.com वर बुकिंग स्वीकारत होतं आणि लोक अजूनही बुकिंग करत होतं. “हे खूप निराशाजनक होते. मला ब्लॅकपूलमध्ये दुसरे हॉटेल शोधावं लागलं आणि नवीन बुकिंगसाठी पुन्हा पैसे द्यावे लागले” असा अनुभव बेथनीने सांगितला. मजेत ती पुढे असंही म्हणाली, मला वाटतंय मीच शापीत आहे.
लोकांनी शेअर केले वाईट अनुभव
TripAdvisor आणि इतर प्लॅटफॉर्मवर अर्नक्लिफ हॉटेलचे रेटिंग आता 2.9/5 पर्यंत घसरले आहे. ताज्या रिव्ह्यूवरून असं दिसून येतं की हे हॉटेल बंद आहे, तरीही बुकिंग साइट्स अजूनही शुल्क आकारत आहेत. त्यावर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत, कृपया हे हॉटेल बूक करू नका, हे बंद आहे. आम्हाला कीहच रिफंड मिळालं नाही , असं लिहीत एकाने लोकांना इशारा दिला. “आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा हॉटेलमध्ये अंधार होता आणि कोणीही प्रतिसाद दिला नाही. आम्हाला ताबडतोब मुलांसह दुसरे हॉटेल शोधावे लागले.” असं आणखी एकाने लिहीलं. तिथे आधी राहिलेल्या लोकांनीही ते “घाणेरडे आणि धोकादायक” असल्याचे वर्णन केले.
Booking.com ने मागितली माफी, वेबसाइटवरून हटवलं हॉटेल
हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यावर Booking.com ने माफी मागितली. “या घटनेबद्दल कळल्यावर आम्हाला खूप दुःख झाले आहे. अशा बनावट किंवा बंद पडलेल्या हॉटेल्सची यादी दुर्मिळ असली तरी, आम्ही प्रत्येक प्रकरणाची चौकशी करतो. हे हॉटेल सध्या आमच्या वेबसाइटवरून काढून टाकण्यात आलं आहे आणि ज्यांनी या हॉटेलमध्ये बुकिंग केले होते त्यांना पूर्ण रक्कम परत करण्यात आली आहे.” असं त्यांनी नमूद केलं.
