‘दिल टूटा आशिक’ नावानं तरुणानं उघडलं चहाचं दुकान; लोकांची उसळली गर्दी

विशेष म्हणजे या चहाच्या दुकानांबाहेर लोकांची गर्दी उसळलीय. त्या अवलियानं स्वतः या नावामागचं रहस्य सांगितलंय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:45 PM, 22 Jan 2021
'दिल टूटा आशिक' नावानं तरुणानं उघडलं चहाचं दुकान; लोकांची उसळली गर्दी

डेहराडूनः उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये एक चहाचं दुकान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या चहाच्या दुकानाची त्याच्या नावामुळेच सगळीकडे चर्चा आहे. डेहराडूनमधील 21 वर्षीय दिव्यांशूनं दिल टूटा आशिक नावानं एक चहाचं दुकान उघडलंय. विशेष म्हणजे या चहाच्या दुकानांबाहेर लोकांची गर्दी उसळलीय. त्या अवलियानं स्वतः या नावामागचं रहस्य सांगितलंय. (Dil Tuta Aashiq Chai Cafe By a Youngman From Dehradun)

प्रेमात झालेल्या विश्वासघातानं अनेक जण कोलमडून पडतात. असाच काहीसा प्रकार दिव्यांशूसोबतही घडलाय. परंतु त्यानं स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढलं. दिव्यांशू 6 महिन्यांपर्यंत नैराश्येच्या गर्तेत अडकलेला होता. तसेच तो वारंवार पबजी खेळत असायचा. त्यानंतर त्यानं स्वतःला या परिस्थितीतून बाहेर काढलं आणि चहाचं दुकान उघडलं. तसेच या चहाच्या दुकानाचं नाव दिल टुटा आशिक असं ठेवलं.

दुकान लोकांच्या आकर्षणाचं ठरतंय केंद्रबिंदू

दुकानाचं हे नाव वाचून लोक तिकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. बरीच गर्दी उसळलेली आहे. डेहराडूनमधल्या जीएमएस रोडवर हे दुकान आहे. सध्या हे दुकान लोकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. आजूबाजूच्या परिसरातूनही बरेच लोक या दुकानाला भेट देत आहेत.


चहाच्या दुकानात येणाऱ्या तरुणांची संख्या वाढतीच

दिव्यांशूच्या चहाच्या दुकानामध्ये लोक येत असून, आपले अनुभव शेअर करत आहेत. दुकानात येणाऱ्या तरुणांची संख्या लागोपाठ वाढत आहे. दिव्यांशूचे आई-वडील पूर्णतः त्याची मदत करत आहेत. पहिल्यांदा त्याच्या वडिलांना दुकान चालेल की नाही याची भीती होती, परंतु आता ते खूश आहेत. प्रेम करणं चुकीची गोष्ट नाही. पण जर प्रेमात दगाफटका मिळाल्यास  दुःखी होऊ नये. जीवनात एक नवीन मार्ग शोधायला हवा, असंही त्या तरुणानं सांगितलंय.

संबंधित बातम्या

पिंपरीतल्या अवलियाची यशोगाथा! नोकरी गेल्याने चहाचं दुकान थाटलं; आता महिन्याला 60 हजारांची कमाई!

Dil Tuta Aashiq Chai Cafe By a Youngman From Dehradun