वडील जेलमध्ये, आईनेही सोडलं, 10 वर्षाच्या चिमुकल्याचं कुत्र्यासोबत फुटपाथवर झोपणं, वेदनादायी कहाणी

अंकित दिवसा फुगे विकतो. त्याचबरोबर तो एका चहाच्या दुकानातही काम करत असल्याची माहिती समोर आली आहे (Boy living with dog on footpath in UP).

वडील जेलमध्ये, आईनेही सोडलं, 10 वर्षाच्या चिमुकल्याचं कुत्र्यासोबत फुटपाथवर झोपणं, वेदनादायी कहाणी
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 5:10 PM

लखनऊ : सोशल मीडियावर सामाजिक प्रश्नांशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा अशाप्रकारचे फोटो बघून लोक संबंधित व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव करतात. काही वेळा काही घटना या मन हेलावून टाकणाऱ्या असतात. उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथून एक अशाच प्रकारचा फोटो समोर आला आहे. हा फोटो कुणी मोठी व्यक्ती किंवा सेलिब्रिटीचा नाही. तर एका लहान मुलाचा फोटो आहे. हा मुलगा एका कुत्र्यासोबत फुटपाथवर झोपला आहे (Boy living with dog on footpath in UP).

फोटोतील लहान मुलाची कथा खूप वेदनादायक आहे. मुलाचे वडील जेलमध्ये आहेत. तर आईने त्याला स्वत: पासून वेगळं केलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. या मुलाचं नाव अंकित आहे. त्याचं एका कुत्र्यासोबत चांगली मैत्री आहे. या कुत्र्याचं नाव डॅनी असं आहे. दोघं एकच चादर पांघरुन फुटपाथवर झोपतात (Boy living with dog on footpath in UP). फोटोमध्ये देखील तेच दिसत आहे.

अंकित दिवसा फुगे विकतो. त्याचबरोबर तो एका चहाच्या दुकानातही काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अंकित डॅनीसोबत दररोज एकच चादर पांघरुन फुटपाथवर झोपतो. याबाबतचा त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून अनेकजण भावूक झाले.

दरम्यान, सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनदेखील अंकितच्या मदतीला धावून आलं. मुजफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “आम्ही त्या मुलाला शोधून काढलं आहे. अंकित सोमवारी (14 डिसेंबर) 10 वर्षांचा झाला. सध्या अंकितला जिल्हा पोलिसांच्या देखरेखीत ठेवलं आहे”, असं त्यांनी सांगितलं. पोलिसांकडून अंकितच्या नातेवाईकांचा शोध सुरु आहे.

अंकित ज्या चहाच्या दुकानात काम करतो त्या दुकानाच्या मालकानेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. “अंकित खूप स्वाभिमानी मुलगा आहे. डॅनी कधीच अंकितची पाठ सोडत नाही. विशेष म्हणजे अंकित डॅनीसाठी कोणतीही वस्तू मोफत घेत नाही. डॅनीसाठी दूधही तो विकतच घेतो”, अशी प्रतिक्रिया चहाविक्रेत्याने दिली. दरम्यान, अंकित आणि डॅनीच्या मैत्रीबाबत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : रुपे कार्डधारकांसाठी Good News; आता इंटरनेटशिवाय ‘असे’ काढता येणार पैसे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.