नवी दिल्लीः जगभरात 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. जगभरातील स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रात उभ्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनेसुद्धा ट्विटर एक व्हिडीओ शेअर केलाय. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, चर्चेचा विषय ठरत आहे. (Happy Women’s Day Wishes in Marathi: Video: If you decide to watch a video on Women’s Day, which one will you choose? That’s it for us!)
त्या चार मिनिटांच्या व्हिडीओत 30 जणांना एका खेळात समाविष्ट करण्यात आलंय. त्यात सगळ्यांना एका रांगेत उभे राहण्यास सांगण्यात आलंय. त्यानंतर त्यांना काही प्रश्नही विचारण्यात आलेत. जर त्यात तुमचं उत्तर हो असल्यास एक पाऊल पुढे टाकायचं आणि जर तुमचं उत्तर नाही असल्यास एक पाऊल मागे जायचं. तुम्ही वयाच्या 10 वर्षांच्या आत सायकल चालवायचा शिकला आहात का?, तुम्ही शाळेत गाणी ऐकायचात का?, तुम्ही शाळेत असताना कोणताही क्रीडा प्रकार शिकला आहात का?, तुम्ही शाळेत असताना स्वतःच्या कपड्यांची इस्री करायचात का?, अशा पद्धतीचे बरेच प्रश्न या खेळात विचारण्यात आलेत. तसेच हा खेळही सहभागी झालेल्या 30 जणांनी एन्जॉय केल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळतंय.
या घरातील विजेचे बिल भरण्यापासून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीपर्यंतचे बरेच प्रश्न विचारण्यात आलेत. त्यात पुरुष एक एक पाऊल पुढे टाकत असल्याचं दिसतंय. तर महिला काही पावलं मागे गेल्यात, त्यानंतर पुरुषांना मागे वळून पाहायला सांगण्यात आलंय. अशा प्रकारे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Every woman should watch this today. #WomensDay #FinanciallyEqualpic.twitter.com/5giQ482TIS
— Saina Nehwal (@NSaina) March 7, 2021
या खेळात सहभागी झालेल्या अनय चोक्सींनीसुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच खेळात फार मज्जा आल्याचं त्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे सिद्धार्थ रोस्तगी यांनीसुद्धा कधीही विचार न केलेले प्रश्न अचानक विचारले गेल्यानं थोडं गोंधळून गेल्याची भावना व्यक्त केलीय. एकंदरीतच हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संबंधित बातम्या
International Women’s Day : निता अंबानींचे महिलांसाठी खास ‘Her Circle’, कसं करणार काम?
Happy Women’s Day Wishes in Marathi: Video: If you decide to watch a video on Women’s Day, which one will you choose? That’s it for us!