Mirabai Chanu: वेटलिफ्टर मीराबाई चानूची ‘चांदी’, रौप्यपदक जिंकताच डोमिनोजकडून लाइफटाइम पिझ्झा फ्री

खरं तर नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मीराबाई म्हणाली की तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे. याची दखल घेत डोमिनोस इंडियानं ऑलिम्पिक पदकविजेती चानूला आजीवन मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली. (Lifetime Pizza Free from Dominos for Weightlifter Mirabai Chanu after winning Silver Medal)

Mirabai Chanu: वेटलिफ्टर मीराबाई चानूची 'चांदी', रौप्यपदक जिंकताच डोमिनोजकडून लाइफटाइम पिझ्झा फ्री

मुंबई : भारतीय महिला स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo olympic 2020) वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. वेटलिफ्टिंगमध्ये पदकाची भारताची 21 वर्षांची प्रतीक्षा तिनं संपवली आणि रौप्यपदक जिंकून देशाचे खातंही उघडलं. चानूनं 49 किलो वजनी गटात हे पदक जिंकलेय. मीराबाईनं स्नॅच आणि क्लीन अँड जर्क फेरीत एकूण 202 किलो वजन उचलून हे पदक जिंकलं. यासह देशभर आनंदाची लाट उसळली. सोशल मीडियावरही मीराबाई चानूचे अभिनंदन करणाऱ्यांची गर्दी झाली होती.

पिझ्झा कंपनी डोमिनोजकडून मीराबाई चानूला लाइफटाइम फ्री पिझ्झा

तिच्या यशासाठी सर्व सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच मीराबाई चानूचे अभिनंदन करत आहेत, तर अनेक सरकारी आणि खासगी संस्थांनीही तिला बक्षीस जाहीर केले आहे. डोमिनोज इंडियालाही या यादीत समाविष्ट केलं जाऊ शकते. मल्टीनॅशनल पिझ्झा कंपनी डोमिनोसनं मीराबाई चानूला लाइफटाइम फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबद्दल ट्विट करत डोमिनोजनं लिहिलं आहे की, ‘तुम्ही म्हणालात आणि आम्ही ते ऐकलं. आम्हाला कधीच नको आहे की मीराबाई चानूला पिझ्झा खाण्यासाठी वाट बघावी लागेल. म्हणूनच आम्ही त्यांना आयुष्यभर विनामूल्य डोमिनोजचा पिझ्झा देत आहोत.

पाहा ट्विट

खरं तर नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मीराबाई म्हणाली की तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे कारण ती पिझ्झा  खाऊन बराच काळ झाला आहे. याची दखल घेत डोमिनोस इंडियानं ऑलिम्पिक पदकविजेती चानूला आजीवन मोफत पिझ्झा देण्याची घोषणा केली. डोमिनोजच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावरील लोकांनीही स्वागत केलं. लोक म्हणतात की अशा पात्र चॅम्पियनसाठी उत्सवाची ही सुरुवात आहे ज्याने 1.2 अब्ज लोकांना आनंदाने नाचविले.

संबंधित बातम्या

VIDEO : आई शिकवत होती छोट्या मुलाला पोहायला, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पाराच चढला; वाचा का?

वयाच्या 22 व्या वर्षी 11 मुलं, करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या जोडीला हवे आहेत तब्बल 105 मुलं !

Video | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI