6 पाय आणि 2 शेवट्यांसह जन्माला आला अनोखा श्वान, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

Skipper नावाच्या या श्वानासोबत असं काही घडलं आहे की सगळे थक्क झाले आहेत. कारण, या जगातला असा एकमेव श्वान आहे ज्याला चक्क 6 पाय आणि दोन शेवट्या आहेत.

6 पाय आणि 2 शेवट्यांसह जन्माला आला अनोखा श्वान, फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

जगभरात असे अनेक प्राणी आहेत. ज्यांच्या शरीराची रचनाच वेगळी असते. आताही असंच एक प्रकरण समोर आलं आहे. Skipper नावाच्या या श्वानासोबत असं काही घडलं आहे की सगळे थक्क झाले आहेत. कारण, या जगातला असा एकमेव श्वान आहे ज्याला चक्क 6 पाय आणि दोन शेवट्या आहेत. (miracle puppy born with 6 legs and 2 tails photo viral on social media)

6 पाय आणि 2 शेवट्यांसह जन्म झालेल्या या श्वानाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. नेटकऱ्यांनी तर यावर आश्चर्य व्यक्त करत लोक या कुत्राला निसर्गाचा करिश्मा असल्याचं म्हणत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक असामान्य वैद्यकीय स्थिती आहे. या प्रकारामुळे संपूर्ण वैद्यकिय क्षेत्राला धक्का बसला आहे. या स्किपरचा फोटोही सध्या मीडियामध्ये व्हायर झाला आहे.

Neel Veterinary Hospital मधला हा फोटो फेसबूकवर शेअर करण्यात आला असून या बातमीला आतापर्यंत 2.7 हजार शेअर्स आणि 3.9 हजार कमेंट्स आल्या आहेत. या घटनेमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे असमान्य जन्म होऊन श्वानाची प्रकृती ठीक आहे. त्याच्यावर रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत.

This is a miracle named Skipper. Literally. She has survived longer than we suspect any other canine has (at just 4 days…

Posted by Neel Veterinary Hospital on Sunday, 21 February 2021

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा परिस्थितीतही श्वान निरोगी जीवन जगेल. डॉक्टर श्वान आईच्या गर्भाशयात दोन बाळांचा जन्म झाला. पण गर्भाशयात गर्भाचे विभक्त न झाल्यामुळे 2 जास्तीचे पाय आणि 1 जास्तीची शेपटीसह स्कीपरचा जन्म झाला. (miracle puppy born with 6 legs and 2 tails photo viral on social media)

संबंधित बातम्या – 

VIDEO : या जगात माणुसकी शिल्लक आहे का? हत्तीला निर्दयीपणे मारहाण

Shocking Video! लाईव्ह रिपोर्टिंग करताना चोरट्याने रोखली पत्रकारावर बंदूक, पुढे काय झालं तुम्हीच पाहा

VIDEO : कुत्र्याची अनोखी शक्कल ! चिमुकलीला नदीत बुडण्यापासून वाचवलं, उगाच इमानदार नाही म्हणत

(miracle puppy born with 6 legs and 2 tails photo viral on social media)

Published On - 1:38 pm, Wed, 24 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI