Rakshabandhan 2022 : गुजरात मध्ये देशातील सर्वात महाग राखी; किंमत ऐकून असा प्रश्न पडेल की ही राखी हातात बांधायची की लॉकरमध्ये ठेवायची

गुजरातमधील सुरत शहरात एका ज्वेलर्सने राखी बनवली आहे, ज्याची किंमत पाच लाख रुपये आहे. यामध्ये सोने, चांदी, डायमंड आणि प्लॅटिनमचा वापर करण्यात आला आहे. ही राखी सुरत शहरातील ज्वेलर्स दीपक भाई चोक्सी यांनी बनवली आहे. तसे, गेल्या वर्षीही गुजरातमधील सुरत शहरातील एका बहिणीने आपल्या भावासाठी खास ऑर्डर देऊन पाच लाख रुपयांची राखी बनवली.

Rakshabandhan 2022 : गुजरात मध्ये देशातील सर्वात महाग राखी; किंमत ऐकून असा प्रश्न पडेल की ही राखी हातात बांधायची की लॉकरमध्ये ठेवायची
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 10:02 PM

सुरत : बहिण भावाच्या अतूट आणि पवित्र नात्याचा म्हणजे रक्षाबंधनाचा सण(Rakshabandhan 2022) रक्षाबंधनाच्या विधीनुसार बहीण भावाच्या घरी येते आणि त्याला राखी बांधून तिच्या रक्षणाचे वचन (A promise of salvation) घेते. यामुळेच साध्या रेशमी धाग्यालाही मोठं महत्व असतं. आपल्या भावाच्या हातावर सर्वात सुंदर राखी बांधावी यासाठी बहिणी अगदी सगळा बाजार पालथा घालून मनासारखी राखी खरेदी करतात. मात्र, आता बाजारात अशी राखी आली की याची किंमत पाहून डोळे फिरतील. देशातील सर्वात महागडी राखी गुजरातच्या बाजारपेठेत पहायला मिळाली आहे. किंमत ऐकून असं वाटल की ही राखी हातात बांधायची की लॉकरमध्ये ठेवायची.

गुजरात मधील सुरत येथील एका दुकानात देशातील सर्वात महागडी राखी पहायला मिळाली आगे. या राखीची किंमत तब्बल 5 लाख रुपये आहे. या दुकानात धाग्यापासून बनवलेल्या राख्या ते सोने, चांदी, प्लॅटिनम ते डायमंडने जडलेल्या सर्व प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. या राख्यांच्या सौंदर्याचे आणि डिझाइनचे कौतुक करत आहेत. तर, 5 लाखांच्या राखीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

पाच लाखाच्या राखीत सोने, चांदी, डायमंड आणि प्लॅटिनमचा वापर

गुजरातमधील सुरत शहरात एका ज्वेलर्सने राखी बनवली आहे, ज्याची किंमत पाच लाख रुपये आहे. यामध्ये सोने, चांदी, डायमंड आणि प्लॅटिनमचा वापर करण्यात आला आहे. ही राखी सुरत शहरातील ज्वेलर्स दीपक भाई चोक्सी यांनी बनवली आहे. तसे, गेल्या वर्षीही गुजरातमधील सुरत शहरातील एका बहिणीने आपल्या भावासाठी खास ऑर्डर देऊन पाच लाख रुपयांची राखी बनवली होती. ही देशातील सर्वात महागडी राखी असल्याचे सांगण्यात आले. ही राखी सोने आणि हिऱ्यांचे मिश्रण करून बनवण्यात आली होती. त्यात रेशमी धाग्याऐवजी सोन्याचे ब्रेसलेट आणि हिरा आहे. ही राखी सुरत शहरातील डी. खुशालदास ज्वेलर्सने बनवली आहे.

2018 मध्ये नाशिकच्या जयेश बाफना यांनी बनवली होती 2.5 लाखांची राखी

यापूर्वी 2018 मध्ये नाशिकच्या एका ज्वेलर्सने सर्वात महागडी राखी तयार केली होती. ही राखी 2.5 कॅरेट हिऱ्यापासून बनवली गेली होती. ही राखी बनवायला सुमारे 25 दिवस लागले होते.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.