डोक्यावर सिलेंडर, पाठीवर बॅग… शाळकरी मुलीचा Video पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
सोशल मीडियावर एका शाळकरी मुलीचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाठीवर दप्तर आणि डोक्यावर गॅस सिलेंडर घेऊन चाललेल्या या 'सुपरगर्ल'चा संघर्ष शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी एकत्र कशी निभावते हे दिसत आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीही सांगता येत नाही. खऱ्या जीवनातील सुपरहिरो कधीच पडद्यावर नसतात, ते आपल्या आजूबाजूला असतात. सध्या सोशल मीडियावर अशा एका सुपरगर्ल असलेल्या शाळकरी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. पण तिचा आत्मविश्वास पाहून सगळ्यांनी तिला सलाम केला आहे. ही मुलगी आजच्या काळातील खरी सुपरगर्ल असून ती एकाच वेळी दोन मोठी कामं सांभाळताना दिसत आहे, हेच यातून दिसत आहे.
नेमकं व्हिडीओत काय?
या व्हिडीओमध्ये एक सलवार कुर्ता घातलेली मुलगी दिसत आहे. तिच्या पाठीवर इतर मुलांसारखे शाळेचे जड दप्तर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे तिने तिच्या डोक्यावर स्वयंपाकाचा एलपीजी गॅस सिलेंडर उचलून घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होत असून dineshwar_0673 नावाच्या हँडलवरून तो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतून तिची शिक्षणाप्रती निष्ठा दर्शवते आणि कुटुंबाची जबाबदारी या दोन्हीही गोष्टी अधोरेखित होत आहेत.
यात ही मुलगी शाळेतून परतत आहे की शाळेत जात आहे, हे निश्चित नसले तरी या व्हिडीओत त्या मुलीच्या आयुष्यातील दुहेरी संघर्ष स्पष्टपणे दिसत आहे. एका बाजूला शिक्षण मिळवण्याची धडपड आणि दुसऱ्या बाजूला घर चालवण्यासाठी आवश्यक असणारी शारीरिक मेहनत करताना ती दिसत आहे. तसेच अत्यंत गरीब परिस्थितीतही मुलं कशाप्रकारे आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलतात आणि शिक्षणाची जिद्द कायम ठेवतात, हे देखील यातून पाहायला मिळत आहे.
यावेळी रस्त्यावर दुचाकीस्वार, ऑटो आणि पादचारी लोकांची मोठी गर्दी असतानाही, ही मुलगी शांत आणि आत्मविश्वासाने आपले पाऊल पुढे टाकत चालत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर ना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा घाई अजिबात दिसत नाही. यामुळे तिच्या रोजच्या जीवनातील संघर्षाची तिला सवय झाली असावी, हे स्पष्ट झाले आहे.
जिनको कंधो मे जिम्मेदारी होता है सब मोहमाया खत्म हो जाता है
चाहे लड़का हो या लड़की सबको अपना अपना घर का जिमेदारी निभाना पड़ता है pic.twitter.com/br3y0bgYZx
— dineshwar patel (@dineshwar_0673) December 7, 2025
समाजातील आर्थिक विषमतेचे गंभीर चित्र
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत हा प्रकार समाजातील आर्थिक विषमतेचे गंभीर चित्र असल्याचे म्हटले आहे. आजही देशातील बालकांना अशा पद्धतीने बालमजुरी करावी लागत असेल, तर सरकारच्या कल्याणकारी योजना कुठे आहेत? असा सवाल एकाने केला आहे. तर एकाने जबाबदारीला वयाचे बंधन नसते, हे खरे आहे; पण या मुलीचे बालपण हिरावले जात आहे. परमेश्वराने कोणालाही असे दिवस दाखवू नयेत.” अशा शब्दात हळहळ व्यक्त केली जात आहे.
