आनंद महिंद्राकडून खास व्हिडीओ शेअर; वीज तयार करण्याचा नवाच ‘जुगाड’

आता आनंद महिंद्रांनी असाच एक हटके व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. Share a special video from Anand Mahindra

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:14 PM, 10 Apr 2021
आनंद महिंद्राकडून खास व्हिडीओ शेअर; वीज तयार करण्याचा नवाच 'जुगाड'
Anand Mahindra

नवी दिल्लीः उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात, सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवरून ते बरेच ट्विटही करत असतात. तसेच बऱ्याचदा सरकारला काही ना काही सल्लेही देत असतात. आता आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra) असाच एक हटके व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. (Share a special video from Anand Mahindra; A new way of generating electricity)

बकऱ्यांच्या कोकरांचा गमतीशीर व्हिडीओ व्हायरल

शनिवारी आनंद महिंद्रा यांनी मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय, ज्याला पाहून लोक पुन्हा एकदा त्यांचे चाहते बनलेत. बकऱ्यांच्या कोकरांचा एक गमतीशीर व्हिडीओ आहे, परंतु महिंद्रा त्याकडे ऊर्जेचे नवीन स्रोत म्हणून पाहात आहेत. पण कसे? त्यासाठी तुम्हाला व्हिडीओ बारकाईनं पाहावा लागेल. आपण हे केवळ व्हिडीओ पाहून समजून घेऊ शकता! आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तसे तो फक्त गोंडस प्राण्यांचा एक व्हिडीओ आहे. पण माझ्या मते जगाला ऊर्जेचा एक नवीन स्त्रोत सापडला – # बकऱ्यांच्या या फिरत्या शेपटींना टर्बाईन आणि प्रेस्टोने जोडा आणि मग आपणास वीज मिळेल! ” आनंद महिंद्राचं हे ट्विट आतापर्यंत 4 हजारांपर्यंत अधिक लोकांच्या पसंतीस उतरलं आहे. व्हिडीओ 44 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेलाय.


…म्हणून आनंद महिंद्रांनी सांगितला ऊर्जेचा नवीन स्रोत

या 1 मिनिट 15 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, एक माणूस बकरीच्या कोकरांना बॉटलमधून दूध प्यायला देत आहे. यासाठी त्याने एक जबरदस्त जुगाड केलाय आणि दुधाच्या बाटल्या ठेवण्यासाठी एक लाकडाचा विशेष रॅक बनवण्यात आलाय. त्या रॅकमध्ये रांगेत दूधाच्या बॉटेल ठेवण्यात आल्यात. सर्व कोकरे बाटल्यांमधील दूध निप्पलच्या मदतीने पित आहेत. यावेळी त्यांची छोटी शेपटी ते जोरजोरात हलवत आहेत, ज्यास आनंद महिंद्राने ऊर्जेचा नवीन स्रोत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीची डोक्यालिटी, थेट माजी क्रिकेटपटूने घेतली दखल

धक्कादायक ! शीतपेय दिले नाही म्हणून गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल

Share a special video from Anand Mahindra; A new way of generating electricity