Video | छोट्या मुलाचा निरागसपणा, कशाचीही भीती न बाळगता जिराफाला दिला चारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सध्या चर्चेत येणारा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये छोट्या मुलाचा निरागसपणा आणि प्राण्याचं निर्भेळ प्रेम दाखवण्यात आलं आहे

Video | छोट्या मुलाचा निरागसपणा, कशाचीही भीती न बाळगता जिराफाला दिला चारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
VIRAL VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. लहान मुलांचे व्हिडीओ तर खास चर्चेचा विषय ठरतात. सध्या चर्चेत येणारा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये छोट्या मुलाचा निरागसपणा आणि प्राण्याचं निर्भेळ प्रेम दाखवण्यात आलं आहे.

मुलाचे धाडस अन् निरागसपणा पाहून नेटकरी भारावले

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा मुलगा दिसतोय. हा मुलगा सर्वांत उंच असलेला प्राणी म्हणजेच जिराफला चारा देत आहे. कशालाही न घाबरता या मुलाने आपला हात वर करुन जिराफला चारा दिला आहे. छोट्या मुलाचे हेच धाडस आणि निरागसपणा लोकांना आवडला आहे.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय खास आहे. या व्हिडीओमध्ये छोटा मुलगा आपला हात आकाशाकडे करत जिराफला चारा खायला देत आहे. मुलाला पाहून उंच मान असलेला जिराफ खाली आलाय. मुलाच्या हातातील चारा खाण्याचा तो प्रयत्न करतोय. व्हिडीओतील मुलगा खूपच छोटा असल्यामुळे जिराफच्या तोंडामध्ये तो चारा येत नाहीये. पण दोन ते तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर जिराफ मुलाकडून चारा घेण्यात यशस्वी ठरलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा सर्व प्रसंग कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. या छोट्या मुलाचे धाडस पाहून नेटकरी भारावले आहेत. मुलाचे प्राण्यांविषयी असलेले प्रेमदेखील अनेकांना आवडले आहे. हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. हा सोबतच तुम्ही कितीजरी छोटे असले तरी मनातून गोष्टी दोत जा. तसेच तुम्ही कितीजरी मोठे असले तरी सगळं विनम्रतेने स्वीकारा, असे समर्पक कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी त्याला  लाईक तसेच मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

इतर बातम्या :

Video: ग्वाल्हेरच्या सर्वात तिखट पाणीपुरीची चव चाखलीय?, पाहा तर्रीदार पाणीपुरीचा व्हिडीओ

Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!

Video: अहमदनगरमध्ये मद्यधुंद बाईकस्वाराची शेतकऱ्याला धडक, लोक म्हणाले, अशांना चांगलं चोपलं पाहिजे!


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI